Livestock Protection: राज्यातील गायवर्ग पशुधनाला लम्पी चर्मरोगापासून सुरक्षित ठेवण्यासाठी २०२६-२७ या वर्षातील लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला वेग देण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात एकूण उत्पादनाच्या ४० टक्के म्हणजेच ३७ लाख ५२ हजार गोटपॉक्स लसमात्रांचे जिल्हानिहाय नियोजनबद्ध वाटप सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती पशुसंवर्धन आयुक्त डॉ. किरण पाटील यांनी दिली..पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील लम्पी प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पुणे येथील पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेमार्फत गोटपॉक्स लसींचे उत्पादन सुरू करण्यात आले आहे. २१ व्या पशुगणनेनुसार जिल्हानिहाय गायवर्ग पशुधनाची संख्या विचारात घेऊन लसमात्रांचे वाटप करण्यात येत आहे. मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी सर्व जिल्हा उपआयुक्त (पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय) यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या आहेत..Livestock Vaccination: माॅन्सूनपूर्व ८० टक्के पशुधन लसीकरण पूर्ण.लशींची वाहतूक व साठवणुकीदरम्यान शीतसाखळी व्यवस्थापनात कोणताही खंड पडू नये, यासाठी विशेष दक्षता घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच अधिक दूध उत्पादन देणाऱ्या आणि उच्च उत्पादनक्षम पशुधनाचे प्राधान्याने लसीकरण करण्यावर भर देण्यात आला आहे, असेही ते म्हणाले..मोहिमेच्या प्रगतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी नियमित अहवाल प्रणाली कार्यान्वित करण्यात आली असून, जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना दैनंदिन एकत्रित अहवाल दररोज सकाळी ११ वाजेपर्यंत सादर करण्याच्या सूचना पशुवैद्यकीय जैवपदार्थ निर्मिती संस्थेचे सहआयुक्त (पशुसंवर्धन) डॉ. याह्याखान पठाण यांनी दिल्या आहेत..Pre Monsoon Livestock Vaccination: पशुधन संरक्षणासाठी राज्यात मॉन्सूनपूर्व रोगप्रतिबंधक लसीकरण मोहिमेला सुरुवात.‘सक्रीय सहभाग नोंदवावा’गोटपॉक्स लसीकरण हा सर्वात प्रभावी प्रतिबंधात्मक उपाय आहे. क्षेत्रीय स्तरावर राबविण्यात येणाऱ्या या मोहिमेत पशुपालकांनी सक्रीय सहभाग नोंदवून सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. पाटील यांनी केले आहे..‘हॉटस्पॉट’ तालुक्यांवर विशेष लक्षगतवर्षी ज्या तालुक्यांमध्ये लम्पी चर्मरोगाचा प्रादुर्भाव अधिक प्रमाणात आढळला होता, त्या तालुक्यांमध्ये प्राधान्याने लसीकरण मोहीम राबविण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या मोहिमेत सहकारी दुग्ध संघ, स्वयंसेवी संस्था, खाजगी पशुवैद्यक आणि पशुसेवादाते यांचे सक्रिय सहकार्य घेण्याचे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.