Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

चिकू पिकासाठी विमा योजना

मृग बहर-२०२२ मध्ये चिकू पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते.

विनयकुमार आवटे

मृग बहर-२०२२ मध्ये चिकू पिकासाठी ही योजना अधिसूचित जिल्हा व अधिसूचित तालुक्यातील, अधिसूचित महसूल मंडळात राबविण्यात येते. सदर योजना (Crop Insurance) कार्यान्वित करणारी विमा कंपनी (Insurance Company) शासनाच्या महावेद प्रकल्पांतर्गत स्थापन केलेल्या हवामान केंद्रामध्ये नोंदविलेल्या हवामानाच्या तपशिलानुसार विमा योजनेत भाग घेतलेल्या शेतकऱ्यांना परस्पर नुकसानभरपाई देईल. चिकू पिकास निवडलेल्या विमा कंपनीमार्फत खाली नमूद केलेल्या विमा संरक्षण कालावधीत निवडक हवामान धोक्यामुळे होणाऱ्या संभाव्य पीक नुकसानीस(आर्थिक) खालीलप्रमाणे विमा संरक्षण प्रदान होईल. चिकू बाग वय वर्षे ५ पूर्ण झालेल्या उत्पादनक्षम बागेस विमा संरक्षण राहील.

विमा संरक्षण कालावधी आणि प्रमाणके

विमा संरक्षण प्रकार (हवामान धोके)--- विमा संरक्षण कालावधी--- प्रमाणके (ट्रीगर) व नुकसानभरपाई रक्कम (रुपये प्रति हेक्टरी)

जादा आर्द्रता व जास्त पाऊस ---- १ जुलै ते ३० सप्टेंबर--- या कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग ५ दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास आणि प्रति दिन २० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ४ दिवस झाल्यास २७,००० रुपये

--- कालावधीत सापेक्ष आर्द्रता सलग १० दिवस ९० टक्क्यांपेक्षा जास्त राहिल्यास व प्रति दिन २० मि.मी. किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस सलग ८ दिवस झाल्यास ६०,००० रुपये.

१) विमा संरक्षण रक्कम प्रति हेक्टरी ६०,००० रुपये

२) शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता ३,००० ते १८,००० रुपये प्रति हेक्टरी. शेतकऱ्यांसाठी विमा हप्ता हा सर्वसाधारणपणे विमा संरक्षित रकमेच्या ५ टक्क्यांच्या मर्यादेत असतो. मात्र एकूण वास्तव दर्शी विमा हप्ता ३५ टक्क्यांहून अधिक असल्यास त्या अधिक विमा हप्त्यातील ५० टक्के भार शेतकऱ्यांना उचलावा लागतो. विमा हप्ता दर जिल्हा निहाय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे शेतकऱ्याने भरावयच्या विमा हप्त्यात जिल्हानिहाय फरक असू शकतो.

३) या योजनेत अधिसूचित क्षेत्रात, अधिसूचित फळपिकासाठी कुळाने, भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसहित इतर सर्व शेतकरी भाग घेवू शकतात.

४) पीककर्ज घेणाऱ्या आणि बिगर कर्जदारांसाठी योजनेतील सहभाग ऐच्छिक राहणार आहे.

५) बिगर कर्जदार शेतकरी विहित मुदतीत बँकेने किंवा ऑनलाइन फळपीक विमा पोर्टल www.pmfby.gov.in वर विमा हप्ता जमा करून सहभाग घेवू शकतात. त्यासाठी आधार कार्ड, जमीन धारणा ७ /१२ , ८(अ) उतारा व पीक लागवड स्वयंघोषणा पत्र, फळबागेचा जिओ टॅगिंग केलेला फोटो, बँक पास बुकवरील बँक खाते बाबत सविस्तर माहिती लागेल.कॉमन सर्व्हिस सेंटरमार्फत अर्ज ऑनलाइन भरता येतील.

विमा योजनेत समाविष्ट जिल्हे आणि संबंधित कंपनी जिल्हे ---- विमा कंपनीचे नाव व पत्ता

नगर, नाशिक, पालघर, सोलापूर --- रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी लि.

बीड, औरंगाबाद, सांगली, ठाणे, परभणी, जालना --- एचडीएफसी एर्गो जनरल इन्शुरन्स कं. लि.

बुलडाणा, जळगाव, पुणे, उस्मानाबाद--- भारतीय कृषी विमा कंपनी लिमिटेड.

--------------------

१) अधिसूचित फळपिकांपैकी एका फळपिकासाठी एका वर्षात एकाच क्षेत्रावर मृग किंवा आंबिया बहरापैकी, कोणत्याही एकाच हंगामासाठी विमा संरक्षण अर्ज करता येईल.

२) एक शेतकरी ४ हेक्टरच्या मर्यादेत विमा संरक्षण घेवू शकतो.

३) शेतकऱ्यांसाठी ऑनलाइन हप्ता भरण्यासाठी विमा पोर्टल www.pmfby.gov.in

भाग घेण्यासाठी अंतिम दिनांक ३० जून, २०२२.

४) अधिक माहितीसाठी शेतकऱ्यांनी महाराष्ट्र शासन संकेत स्थळ www.maharashtra.gov.in वर दिनांक १८/०६/२०२१ रोजीचा संबंधित शासन निर्णय पाहावा. आपल्या संबंधित विमा कंपनी, तालुका कृषी अधिकारी कार्यालयासाठी संपर्क साधावा.

---------------

(लेखक कृषी आयुक्तालय, पुणे येथे मुख्य सांख्यिक आहेत.)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Raisins Deal : पेमेंट द्या; अन्यथा सौद्यात सहभाग नाही

Cotton Moisture Content : कापसातील ओलाव्यासाठी हवा १५ टक्क्यांचा निकष

Yellow Peas Import : पिवळा वाटाणा आयात पोहोचली १२.५४ लाख टनांवर

Maharashtra Assembly Election Counting : आज मतमोजणी; ८ वाजता सुरुवात

Maharashtra Winter Weather : किमान तापमानात चढ-उतार शक्य

SCROLL FOR NEXT