Crop Damage Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पावसाचा आघात सुरू; पण विमा कंपनी स्वीकारेना तक्रार

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : ‘‘पीकविमा नुकसान भरपाईसाठी (Crop Damage Compensation) एकदा तक्रार दिली की पुन्हा कितीही नुकसान (Crop Damage) झाले तरी तक्रार स्वीकारली जात नाही. मग वारंवार नैसर्गिक आपत्तीने (Natural Calamity) होणारे नुकसान कळवायचे तरी कसे,’’ असा सवाल करत सोयगाव तालुक्यातील शेतकरी ईश्‍वर सपकाळ यांनी आपली पीक नुकसानीची व्यथा मांडली.

सपकाळ म्हणाले, ‘‘यंदा एकूण पिकांपैकी सात हेक्टर कपाशी, दोन हेक्टर उडीद, दीड हेक्टर मूग व ८० आर तूर पिकाचा विमा शासनाच्या ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीकडे उतरविला. आधी अतिवृष्टीमुळे झालेल्या अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची ऑनलाइन तक्रार केली. त्याचा पंचनामाही झाला. परंतु सहा दिवसांपासून पुन्हा एकदा वादळ व जोरदार पाऊस होत आहे.

४ ऑक्टोबरला वादळासह आलेल्या पावसात कपाशीची अनेक झाड मोडली. पाच ते नऊ ऑक्टोबरदरम्यान सततच्या पावसाने कपाशीच्या पिकाची पुरती वाट लागली. फुटलेल्या कापसाच्या वाती झाल्या, बोंडे सडली. ऑनलाइन तक्रार नोंदवून कंपनीला कळविण्याचा प्रयत्न केला. परंतु पुन्हा तक्रारीचा पर्याय नसल्याने ती स्वीकारली जात नाही. त्यामुळे विमा कंपनीच्या तालुका प्रतिनिधीसह तहसीलदारांना या विषयी अवगत केले. त्यामधून पुन्हा तक्रारीचा पर्याय नसल्याची बाब समोर आली.

ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीच्या व्यवस्थेत एकदा झालेल्या नुकसानीची तक्रार केल्यानंतर पुन्हा अतिवृष्टी व इतर नैसर्गिक आपत्तीने नुकसान झाल्यास तक्रारच करता येत नाही. त्यामुळे नुकसानीचे काय करावे, या विवंचनेत असल्याचे सपकाळ म्हणाले. या संदर्भात ॲग्रिकल्चर इन्शुरन्स कंपनीचे जिल्हा समन्वयक कांबळे म्हणाले, ‘‘पुन्हा तक्रारीचा पर्याय नाही, परंतु मंडळातील पीक उत्पादकतेमध्ये घट आल्यास काढणीपश्‍चात पीकविमा नुकसान भरपाई मिळू शकते.’’

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Biogas Scheme: आता 'सीएनजी', 'पीएनजी'मध्ये बायोगॅसचं मिश्रण? 'गोबरधन' योजनेला मंजुरी, शेतकऱ्यांना कसा होईल फायदा?

Dudhna Dam Water Update: निम्न दुधना धरणात २६.६० टक्के पाणीसाठा

PM Kisan Installment: राज्याच्या निर्णयाअभावी थकले ‘पीएम किसान’चे दोन हप्ते

Wild Animal Crop Damage: शेतशिवारातील पिकांवर वन्यप्राण्यांची नजर

Nashik Ring Road Project: नाशिक रिंग रोडबाबत उच्चस्तरीय बैठक

SCROLL FOR NEXT