Dudhna Dam Water Update: निम्न दुधना धरणात २६.६० टक्के पाणीसाठा
Rainfall Update: पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस न झाल्याने सेलू तालुक्यातील ब्रह्मवाकडी येथील निम्न दुधना प्रकल्पातील पाणीसाठ्यात अपेक्षित वाढ झालेली नाही. बुधवारी (ता. ५) सकाळी ६ वाजेपर्यंत धरणात ६४.४२९ दलघमी (२६.६० टक्के) पाणीसाठा नोंदविण्यात आला.