Farm Pond Subsidy Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agriculture Irrigation Scheme : ‘कृषी सिंचन योजने’अंतर्गत मिळणार वैयक्तिक शेततळे

Farm Pond Scheme : मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनामध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करीत शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली आहे.

Team Agrowon

Washim News : मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनामध्ये वैयक्तिक शेततळे या बाबीचा समावेश करीत शेततळे अनुदानाच्या रकमेत ५० टक्के वाढ करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेततळे या घटकाची महाडीबीटी प्रणालीद्वारे तालुकानिहाय लक्ष्यांक देऊन ऑनलाइन सोडतीद्वारे लाभार्थ्यांची निवड केली जाईल.

अर्जदार शेतकऱ्याकडे स्वतःच्या नावावर किमान ०.४० हेक्टर क्षेत्र जमीन असावी व जमीन शेततळे खोदण्यास योग्य असणे आवश्यक आहे. शेततळे, सामूहिक शेततळे किंवा इतर शासकीय योजनेतून अनुदानाचा लाभ घेतलेले नसावे.

शेततळ्याच्या जागा निवडीचे तांत्रिक निकष ज्या जमिनीत पाणी पाझरण्याचे प्रमाण कमी आहे, काळी जमीन ज्यात चिकण मातीचे प्रमाण जास्त आहे, अशा जमिनी शेततळ्यास योग्य असल्याने निवड करण्यात यावी. पाणलोट क्षेत्रात, टंचाईग्रस्त गावातील लाभ क्षेत्रात घेण्यात यावी.

शेततळ्यासाठी आकारमाननिहाय अनुदान मिळेल. शेततळ्यांकरिता १४,४३३ ते ७५ हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते. वैयक्तिक शेततळ्यासाठी विविध आठ प्रकारचे आकारमान दर्शविण्यात आले असले, तरी शेततळ्याचे आकारमान व होणारे खोदकाम यानुसार अनुदान देण्यात येईल.

मंजूर आकारमानापेक्षा जास्त आकारमानाचे शेततळे घ्यावयाचे असल्यास मंजूर अनुदानापेक्षा जास्त लागणारा खर्च हा लाभार्थी शेतकऱ्यांना करावा लागेल. जिल्ह्यास एकूण २५५ शेततळ्याचे उद्दिष्ट असून, तालुकानिहाय ते निश्‍चित करण्यात आले आहे.

तरी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी मुख्यमंत्री शाश्‍वत कृषी सिंचन योजनेअंतर्गत वैयक्तिक शेततळे या योजनेसाठी महाडीबीटी पोर्टल https://mahadbtmahit.gov.in/Farmer/Login या संकेतस्थळावर अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरीफ शहा यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dairy Farming Success Story: संतुलित आहार आणि नियोजनबद्ध गोठा व्यवस्थापनावर भर

Orchard Management: तापमानवाढ, कमी आर्द्रता स्थितीत बागेचे व्यवस्थापन

Farmer Success Story: प्रयोगशील शेतकरी उद्योजक

Water Conservation: जलसंधारणातील साथीदार...

Ethanol Blended Petrol: केंद्राचे मोठे पाऊल; पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉल मिश्रण, मसुदा जारी

SCROLL FOR NEXT