Government Grant Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Subsidy : संगमनेरमध्ये पहिल्या टप्प्यात ३५६१ शेतकऱ्यांना अनुदान

आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हा बँक जिल्ह्याची आर्थिक कामधेनू ठरली आहे.

टीम ॲग्रोवन

नगर ः आमदार बाळासाहेब थोरात (Balasabh Thorat) यांच्या मार्गदर्शनाखाली नगर जिल्हा बँक जिल्ह्याची आर्थिक कामधेनू ठरली आहे. शासनाच्या महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत, (Mahtma Phule Shetkarin karjamukti Yojna) संगमनेर तालुक्यातील नियमित कर्जफेड करणाऱ्या ३ हजार ५६१ सभासदांच्या खात्यांवर ५० हजार रुपये प्रोत्साहनपर अनुदान वर्ग करण्यात आल्याची माहिती जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष ॲड. माधवराव कानवडे (Ad. Madhavrao Kanvade) यांनी दिली.

कानवडे म्हणाले, की नगर जिल्हा बँकेने कायम शेतकरी व सभासदांचे हित जोपासले आहे. महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत नियमित कर्जफेड करणाऱ्या सभासदांना प्रोत्साहनपर अनुदान देण्यासाठी तालुक्यातून १८ हजार ६५१ सभासदांचे रेकॉर्ड अपलोड करण्यात आले होते. त्यापैकी पहिल्या टप्प्यात सुमारे ३ हजार ५६१ सभासदांच्या बँक खात्यांवर अनुदानाची रक्कम जमा झाली आहे.

संगमनेर तालुका कर्जपरतफेडीमध्ये कायम अव्वल स्थानी राहिला आहे. यामध्ये नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. जिल्हा बँकेने शेतकऱ्यांसाठी सोलर पॅनलकरिता कमी व्याजदराने कर्ज देण्याचा, तसेच या हंगामामध्ये सर्व प्रकारच्या पीककर्ज रकमेमध्ये एकरी सरासरी दहा हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम वाढ करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Illegal Sand Mining: बाणगंगे नदीतून अवैध वाळू उपसा

Agricultural College Camp: दर्जी बोरगावमध्ये कृषी महाविद्यालयाचे शिबीर

Wildlife Conflict: शेतांत हत्तींचा कळप ठाण मांडून

Ujani Dam Hunger Strike: उजनी धरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांचे बेमुदत उपोषण

Silk Village Project: लातूर जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात एक रेशीमयुक्त गाव निर्माण करणार

SCROLL FOR NEXT