Employment Guarantee Scheme  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Rojgar Hami Yojana : नांदेडमध्ये ‘रोहयो’अंतर्गत २८३ हेक्टरवर फळबाग लागवड

नांदेड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत कृषी विभागाकडून २०२२-२३ मध्ये फळबाग लागवड योजना राबविण्यात आली.

Team Agrowon

Nanded News : नांदेड जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतंर्गत (Mahatma Gandhi National Employment Guarantee Scheme) कृषी विभागाकडून २०२२-२३ मध्ये फळबाग लागवड योजना (Orchard planting scheme) राबविण्यात आली. यात ३५३ शेतकऱ्यांनी २८३ हेक्टरवर फळबागेसह फुलझाडांची लागवड केली आहे.

यात सर्वाधीक ११९ हेक्टरवर आंबा फळपिकाची लागवड केल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्राने दिली.

कृषी विभागाकडूनही शेतकऱ्यांच्या शेतात तसेच बांधावर विविध प्रकारची फळबाग लागवडीचे कामे केले जातात. यात शेतकऱ्यांना तीन वर्षापर्यंत अनुदान आदायगी केले जाते. जिल्ह्यात सन २०२२-२३ मध्ये १५९० हेक्टरवर फळबाग लागवडीचा नियोजन आराखडा मंजूर केला होता.

यात शेतकऱ्यांनी विविध फळपिकांची लागवड करण्यासाठी नोंदणी केली होती. जिल्ह्यातील ३५३ शेतकऱ्यांनी २८३ हेक्टरवर फळबागेची लागवड केली आहे.

यात सर्वाधीक आंबा फळपिकांची ११९ हेक्टरवर लागवड केली आहे. तर सीताफळ ३४.६५ हेक्टर, पेरू ३१.९० हेक्टर, चिकू २५.४८ हेक्टर, मोसंबी २२.७० हेक्टर, कागदी लिंबू १८.६० हेक्टर, निशिगंध १०.५० हेक्टर, डाळिंब ४.८० हेक्टर, नारळ चार हेक्टर, मोगरा चार हेक्टर, गुलाब ३.८०, तर संत्रा तीन हेक्टर असा एकूण २८३.६ हेक्टरवर फळबाग व फूलबाग लागवड झाली आहे.

तालुकानिहाय फळबाग लागवड

(लागवड हेक्टरमध्ये, कंसात शेतकरी संख्या) : अर्धापूर १६०४० (२६), लोहा ६१.९५ (६१), मुदखेड ११.१० (१५), कंधार ३०.१५ (३९), नांदेड ५.१५ (१७), बिलोली ०० (००), देगलूर १२.९० (१४), धर्माबाद ६.२० (९), मुखेड ७.२० (७), भोकर ३६.४० (४३), हदगाव ४६.७० (५८), हिमायतनगर ९ (१२), किनवट १८.७५ (२४), माहूर ३.७८ (४), उमरी १२.३८ (१७)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Ujani Floating Solar Project: उजनी जलाशयावर केवळ नऊ टक्के क्षेत्रावरच ‘फ्लोटिंग सोलार’ प्रकल्प; जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे स्पष्टीकरण

Wild Boar Attack: शेतशिवारात रानडुकरांचा हैदोस; कपाशी पिकाचे नुकसान

Drought Management: बांधबंदिस्ती, जलसंधारण, पीक नियोजनानेच दुष्काळावर मात शक्य; पोपटराव पवार

Ahilyanagar District Bank Election: अहिल्यानगरला जिल्हा बॅंकेच्या दहा जागांसाठी उद्या मतदान; एकूण सत्तावीस उमेदवार; मंगळवारी मतमोजणी

Maize Trading: चांदूरबाजारमध्ये मक्याची उलाढाल वाढली

SCROLL FOR NEXT