
Nagar News फळबाग लागवड क्षेत्र (Orchard Cultivation Acreage) वाढीसाठी कृषी विभागाकडून (Agriculture Department) प्रयत्न केले जात असले तरी यंदा वर्षाअखेरीची फळबाग लागवड उद्दिष्टाच्या तुलनेत कमीच आहे.
गेल्यावर्षी (२०२१-२२) राज्यात महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेतून (Employment Guarantee Scheme) (मगारारोहयो) ४२ हजार हेक्टरपेक्षा अधिक लागवड झाली होती. यंदा मात्र मार्च अखेर ३८ हजार ५८५ हेक्टरवर लागवड झाली आहे. त्यामुळे ‘मगारारोहयो’तून कमी फळबाग लागवड झाल्याची स्थिती आहे.
राज्यात गेल्या काही वर्षांपासून ‘मगारारोहयो’तून फळबाग लागवडीला प्राधान्य दिले आहे. मागील तीन वर्षांत चांगली लागवड झाल्याने यंदा राज्यात ६० हजार हेक्टरवर फळबाग लागवडीचे कृषी विभागाने उद्दिष्ट निश्चित केले होते. त्यासाठी कृषी सहाय्यकांचा त्यात अधिक सहभाग असावा, यासाठी जबाबदारी दिली.
यंदा ‘मगारारोहयो’तून फळबाग करण्यासाठी नव्याने दराबाबतच्या अंदाजपत्रकाला मान्यता देण्याला उशीर झाला. त्यामुळे यंदा फळबाग लागवडीचा वेग कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र आक्टोबरपासून फळबाग लागवडीला वेग आला.
यंदा ९३ हजार २४२ शेतकऱ्यांनी फळबाग लागवडीसाठी अनुदान मागणी केली होती. ६७ हजार ३९० हेक्टरसाठी तांत्रिक मंजुरी दिली व ६४ हजार ८०७ हेक्टरला प्रशासकीय मंजुरी दिली गेली.
३९ हजार ३५० हेक्टरवर खड्डे खोदले गेले व मार्चअखेर ३८ हजार ५८५ हेक्टरवर हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण झाली आहे. यंदा उद्दिष्टाच्या ६४.३१ टक्के हेक्टरवर फळबाग लागवड पूर्ण करता आली आहे.
मात्र गेल्यावर्षीपेक्षा यंदा कमीच फळबाग लागवड झाली आहे. यंदा ‘मगारारोहयो’सह राज्य शासनाची स्व. भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजनाही सुरु झाली आहे. त्यातील लागवडीचा आकडा वेगळा असेल.
लागवडीत विदर्भ आघाडीवर
राज्यात ९ हजार १६९ कृषी सहाय्यक आहेत. त्यांच्या माध्यमातून फळबाग लागवड यंदा पूर्ण करण्याचे नियोजन आहे. आतापर्यंत ४० हजार हेक्टरवर फळबाग लागवड झाली आहे. मागील वर्षी (२०२१-२२) ४२ हजार हेक्टरवर लागवड झाली होती.
आतापर्यंतच्या लागवडीनुसार गडचिरोली, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ, वाशीम, ठाणे जिल्ह्यांत उद्दिष्टापेक्षा अधिक क्षेत्रावर फळबाग लागवड झाली आहे.
त्यात वर्धा व गोंदिया जिल्ह्यात उद्दिष्टाच्या दुप्पट लागवड झाली आहे. हिंगोली, बीड, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, नांदेड, जिल्ह्यांत मात्र कमी लागवड झाली आहे.
विभागनिहाय लागवड (हेक्टर) (कंसात वर्षभरातील उद्दिष्ट)
ठाणे ः ८,४४८ (१४,४८०), नाशिक ः ६१०१ (१०४५०), पुणे ः ५६४१ (९५००), कोल्हापूर ः १०३० (३८५०), औरंगाबाद ः २१२७ (३७५०), लातूर ः ३१९५ (५८१५), अमरावती ः ६५७० (७१६०), नागपूर ः ५४७० (४९९५)
Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.
ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.