Jalyukta Shiwar Yojana Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jalyukta Shiwar Yojana : जलयुक्त शिवार योजना प्रभावीपणे राबवा : जिल्हाधिकारी

महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेची सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी नागपूर जिल्ह्यात व्हावी यासाठी सर्व उपाययोजनांसह शिवार फेरी आयोजनाची तयारी करा.

Team Agrowon

Nagpur News : महाराष्ट्रात जलयुक्त शिवार योजनेची (Jalyukta Shiwar Yojana) सर्वाधिक प्रभावी अंमलबजावणी नागपूर जिल्ह्यात व्हावी यासाठी सर्व उपाययोजनांसह शिवार फेरी आयोजनाची तयारी करा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर यांनी जिल्हास्तरीय यंत्रणेला केले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील छत्रपती सभागृहामध्ये यासंदर्भात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी सौम्या शर्मा, जलसंधारण विभागाचे कार्यकारी अभियंता एस. व्ही. मस्कावार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे, सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व गटविकास अधिकारी, उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.

राज्यातील टंचाईसदृश परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्य सरकारने जलयुक्त शिवार अभियान २.० साठी नागपूर जिल्ह्यातील २४३ गावांची निवड केली आहे. १ मे रोजी सर्व गावांमध्ये शिवारफेरी व ग्रामपंचायतचे ठराव घेण्यात यावे.

निवड झालेल्या सर्व गावांचे नकाशे तयार ठेवावे. पुढील दहा दिवसांत खर्चाचे आराखडे सादर करावे.

मनुष्यबळाच्या समस्या, तांत्रिक समस्या या संदर्भात आधीच वरिष्ठ कार्यालयाला अवगत करावे व त्यावर सर्व उपविभागीय अधिकाऱ्यांनी तोडगा काढून ही समस्या सोडवावी, शहरानजीकच्या काही गावांबद्दल समस्या असल्यास ती गावे तातडीने बदलून घ्यावी, आवश्यक प्रशिक्षण उपविभागीय अधिकाऱ्यांनी उद्या दयावे, असे स्पष्ट केले.

या सभेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रवींद्र मनोहरे यांनी गावे बदलताना निकष संबंधित यंत्रणेचे पाळणे आवश्यक असल्याचे स्पष्ट केले. जिल्ह्यात ज्या ठिकाणी टंचाईची शक्यता अधिक आहे. अशाच गावांची यामध्ये निवड करण्यात आली आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT