Farm Pond Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farm Pond Scheme : वैयक्तिक शेततळ्यासाठी अर्ज कसा करायाचा ; योजनेसाठी लागणारी कागदपत्रे

दुष्काळी भागात अथवा पाणी टंचाईच्या काळात शेती सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे.

Team Agrowon

Agriculture Irrigation Scheme : दुष्काळी भागात अथवा पाणी टंचाईच्या (Water Shortage) काळात शेती सिंचनासाठी (Irrigation) पाण्याची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळ्यांसाठी (Farm Pond Scheme) सरकारकडून अनुदान (Subsidy) देण्यात येते.

योजनेसाठी आवश्यक कागदपत्रे -

या योजनेसाठी लॉटरीमध्ये निवड झालेल्या शेतकऱ्यांना मोबाईल एसएमएसद्वारे संदेश प्राप्त होतो. त्यानुसार त्यांनी जमीनीचा ७/१२, ८ अ उतारा, आधारकार्ड, बँक पासबुक, हमीपत्र, जातीचा दाखला आदी कागदपत्रे अपलोड करावयाची आहेत.

अशी आहे अनुदान वितरणाची प्रक्रिया -

ही कागदपत्रे तपासून तालुका कृषी अधिकारी संबंधित शेतकऱ्यास ऑनलाईन पूर्वसंमती देतात.

पुर्वसंमती दिल्यानंतर शेततळे खोदाईबाबत क्षेत्रीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या तांत्रिक मार्गदर्शनानुसार शेतकऱ्याने शेततळयाचे काम पूर्ण करुन काम पूर्णत्वाचा दाखला तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे सादर करावा लागतो.

त्यानंतर कृषी पर्यवेक्षक यांनी शेततळ्याची मोका तपासणी करुन अनुदान परिगणना केल्यानुसार शेतकऱ्याला जिल्हास्तरावरुन पीएफएमएस प्रणालीद्वारे अनुदान वितरीत केले जाते.

असा करा अर्ज -

मुख्यमंत्री शाश्वत कृषी सिंचन योजनेंतर्गत वैयक्तिक शेततळे या घटकाचाही समावेश करण्यात आला आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलच्या www.mahadbtmahait.gov.in संकतेस्थळावर ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे.

त्यानंतर 'सिंचन साधने व सुविधा' या शिर्षकाअंतर्गत ‘वैयक्तिक शेततळे’हा पर्याय निवडून पुढील तपशील निवडणे आवश्यक आहे. योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांची निवड ही महाडीबीटी पोर्टलद्वारे लॉटरी पद्धतीने केली जाते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT