Rohit Pawar Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

घरकुलापासून वंचितांना मिळणार अनुदान

सर्व्हेक्षणाअभावी तसेच तांत्रिक चुकीमुळे घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांचे पुन्हा सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.

सूर्यकांत नेटके : ॲग्रोवन वृत्तसेवा

नगर : सर्व्हेक्षणाअभावी तसेच तांत्रिक चुकीमुळे घरकुलाचा लाभ (Benifit Of Gharkul Schem) मिळण्यापासून वंचित राहिलेल्या पात्र लाभार्थ्यांचे पुन्हा सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांचे घरकुलाचे स्वप्न साकार होणार आहे.

याबाबत कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरिराजसिंह यांची आणि राज्यातील अधिकाऱ्यांची भेट घेऊन पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला अखेर त्याला यश आले आहे. केंद्राच्या आदेशाने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्लस प्रपत्र ‘ड’ अंतर्गत पुन्हा सर्व्हेक्षण करून नव्याने यादी तयार केली जाणार आहे. वंचित लोकांना घराचा लाभ देण्यासाठी राज्य सरकार विशेष योजना राबवण्याच्या विचाराधीन आहे.

केद्र सरकारच्या मदतीने ग्रामीण भागात घर नसलेल्या कुटुंबाला पंतप्रधान आवास योजनेतून घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. त्यासाठी सप्टेंबर २०१८ आणि मार्च २०१९ मध्ये केलेल्या सामाजिक, आर्थिक आणि जात सर्व्हेक्षण करण्यात आले होते. यामध्ये पात्र लाभार्थ्यांची प्राधान्यक्रम यादी तयार करण्यात आली होती. मात्र तांत्रिक चुकीमुळे, तसेच सिस्टीममुळे अनेक गरजू लाभार्थी यादीत अपात्र झाले. त्यामुळे गरज असूनही अनेक कुटुंबांना घरकुलाच्या योजनेपासून वंचित राहावे लागत आहे. त्याबाबतच्या लोकांच्या विनंतीनुसार रोहित पवार यांनी पुढाकार घेऊन दिल्ली येथे केंद्रीय ग्रामविकासमंत्री गिरिराजसिंह यांची भेट घेऊन हा प्रश्‍न त्यांच्याकडे मांडला होता.

यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन त्यांना दिले होते. तसेच या योजनेची अंमलबजावणी करणाऱ्या राज्यातील यंत्रणेकडेही आमदार रोहित पवार यांनी वारंवार पाठपुरावा केला होता. त्यानुसार जी यादी तयार झाली आहे. त्यांना लाभ द्या व जे वंचित, गरजू आहेत त्याची यादी करून राज्य पातळीवर विशेष योजना राबवा असे कळवले. त्यानुसार राज्य सरकारकडून राज्यातील सर्व ग्रामीण विकास यंत्रणांकडून अशा वंचित लाभार्थ्यांची संख्या मागवली आहे. मात्र संख्या निश्‍चित सर्व्हेक्षण करावे लागणार असल्याने जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेने जिल्ह्यातील सर्व पंचायत समित्यांना पत्र देऊन घरकुलाच्या वंचित राहिलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांचे सर्वेक्षण करण्याबाबतच्या सूचना दिल्या आहेत.

त्यानुसार गावस्तरावर ग्रामसेवकामार्फत इतर संवर्गातील पात्र कुटुंबांची यादी आणि आवास प्लस प्रपत्र ‘ड’ अंतर्गत पुन्हा सर्वेक्षण करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपापल्या गावच्या ग्रामसेवकाकडे संपर्क साधण्याचे आवाहन पवार यांनी केले आहे. रोहित पवार यांच्या या पाठपुराव्यामुळे केवळ तांत्रिक चुकांमुळे घरांचे गरज असलेल्या वंचित कुटुंबांना घरकुलाचा लाभ मिळणार आहे.

प्रत्येक सरकारी योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांना मिळाला पाहिजे आणि त्यानुसारच मतदार संघातील कोणताही पात्र लाभार्थी घरकुलाच्या योजनेपासून वंचित राहू नये, ही माझी पहिल्यापासूनची भूमिका आहे. परंतु विविध कारणांनी काही कुटुंब घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित होती. त्यासाठी केंद्र सरकार व राज्य सरकारकडे पाठपुरावा केला होता.
रोहित पवार, आमदार, कर्जत-जामखेड

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Women Farmers Empowerment: तिच्या कष्टाचा व्हावा सन्मान

Dam Affected Families Issues: डिंभे धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांना गती द्या : वळसे पाटील

Pune Dams: धरणांतून विसर्गात मोठी वाढ

Vidarbha Flood: विदर्भात मुसळधार पावसाचा कहर; पूरस्थिती गंभीर

Artificial Intelligence: सरपंचांनी ‘एआय’ तंत्र गावशिवारात न्यावे; ‘सकाळ माध्यम समूहा’चे अध्यक्ष पवार यांचे आवाहन

SCROLL FOR NEXT