Reservoir Overflow due to Rain: पुणे जिल्ह्यात गेल्या दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे प्रमुख धरणांमध्ये पाण्याची आवक झपाट्याने वाढली आहे. परिणामी पानशेत, खडकवासला, वीर, मुळशी, पवना, भामा आसखेड, नीरा देवघर, वडिवळे आदी धरणांमधून टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढविण्यात आला असून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. .नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच जनावरे, शेती अवजारे, पंप आणि इतर साहित्य सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे आवाहन जलसंपदा विभागाने केले आहे. पुणे विभागातील प्रमुख धरणांमध्ये चासकमान ९९.७३ टक्के, पानशेत ९८.३९ टक्के, खडकवासला १०० टक्के, वीर ९९.२९ टक्के, पवना ९७.९८ टक्के, भाटघर ९०.६४ टक्के आणि मुळशी ८५.४७ टक्के उपयुक्त पाणीसाठा नोंदविण्यात आला आहे. उजनी धरण ९९.९४ टक्के भरले असून कोयना धरणात ८१.८१ टक्के पाणीसाठा आहे..Warna Dam Water Discharge: वारणा धरणातून ५१०० क्युसेकने विसर्ग.दरम्यान, पानशेत धरणातून दुपारी २ वाजल्यापासून सांडव्याद्वारे १८,११५ क्युसेक आणि जलविद्युत गृहातून ६०० क्युसेकने विसर्ग सुरू करण्यात आला. खडकवासला धरणातून दुपारी २ वाजल्यापासून विसर्ग वाढवून ३५,५७४ क्युसेक करण्यात आला असून परिस्थितीनुसार तो सुमारे ४५ हजार क्युसेकपर्यंत वाढविण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे..Nilwande Dam: नीळवंडे धरणातून विसर्ग सुरू.वीर धरणातून दुपारी अडीच वाजल्यापासून ४६,८७१ क्युसेक, मुळशी धरणातून ८,८०० क्युसेक, पवना धरणातून ९,२०० क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला असून पुढील काळात तो १५ हजार क्युसेकपर्यंत वाढू शकतो. भामा आसखेड धरणातून ९,९०० क्युसेक, नीरा देवघर धरणातून १२,६९७ क्युसेक, तर वडिवळे धरणातून ३,५९२ क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. वरसगाव धरणातूनही सांडव्याद्वारे सुमारे ३,७०० क्युसेक विसर्ग सुरू करण्याची तयारी करण्यात आली आहे..अफवांवर विश्वास ठेवू नयेजिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाने मुठा, नीरा, पवना आणि मुळा नदीकाठच्या सखल भागातील नागरिकांनी विशेष दक्षता घ्यावी, प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन केले आहे. तसेच नदीकाठच्या गावांमध्ये सतर्कतेचा इशारा देऊन उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.