Fruit  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance Update : अपात्र विमा प्रस्तावांपोटी पावणेचौदा कोटी रुपये जप्त

Fruit Crop Insurance : ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’मध्ये खोट्या माहितीच्या आधारे आलेल्या अर्जांची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

Team Agrowon

Pune News : ‘पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजने’मध्ये खोट्या माहितीच्या आधारे आलेल्या अर्जांची चौकशी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. यातून अपात्र विमा प्रस्तावांपोटी पावणेचौदा कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत.

फळपीक विमा योजनेत संशयास्पद कागदपत्रांच्या आधारे गैरप्रकार केला जात आहे, असे कृषी विभागाचे म्हणणे होते. त्यामुळे भारतीय कृषी विमा कंपनी, एचडीएफसी अॅर्गो जनरल इन्शुरन्स कंपनी आणि रिलायन्स जनरल इन्शुरन्स कंपनी या विमा कंपन्यांच्या मदतीने राज्यभर विमा प्रस्तावांची चौकशी सुरू करण्यात आली होती.

शेतकऱ्यांना फसवून खोट्या माहितीच्या आधारे परस्पर विमा उतरविण्यात आल्याचे काही गावांमध्ये आढळले. त्यामुळे ही चौकशी केली आहे. यात शेतकऱ्यांनाही गोवण्याचा प्रयत्न केला गेला. परंतु, कृषी विभागाने कोणत्याही जिल्ह्यात शेतकऱ्यावर फौजदारी गुन्हे दाखल होणार नाहीत, याची काळजी घेतली.

चौकशीअंती केंद्र शासनाच्या नियमानुसार अपात्र प्रस्तावांमधील १३.७८ कोटींची विमा हप्त्याची रक्कम जप्त केली गेली आहे. केंद्र आणि राज्य शासनाचे मिळून एकूण ५३.१० कोटी रुपयांचे अनुदान वाचले.

चौकशीमधील निष्कर्ष असे...

तपासणीयोग्य प्रस्ताव - २४८९३०

तपासलेले प्रस्ताव - १९०३६९

संशयास्पद आढळलेले प्रस्ताव - १४७४३

संशयास्पद प्रस्तावांमधील विमाहप्ता रक्कम - १३.७८ कोटी

या योजनेतील राज्य अनुदान हिस्सा - ३२.१८ कोटी

या योजनेतील केंद्र अनुदान हिस्सा - २०.९२ कोटी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugar Price: साखरेचा किरकोळ दर सलग चौथ्या दिवशी ६० रुपयांच्या खाली, सणासुदीतील मागणीमुळे दरवाढीचा कल

Drought 2026 : राज्य सरकार किती तालुक्यात दुष्काळ जाहीर करू शकतं?

Wildlife Damage: वन्यप्राण्यांपासून पिकांचे नुकसान थांबवा : पालकमंत्री अ‍ॅड. यशोमती ठाकूर

Rain Dry Spell: पावसाची दडी, खरीप संकटात; भरघोस मदतीची मागणी

Maharashtra Drought: महाराष्ट्रात दुष्काळ; शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्या- हर्षवर्धन सपकाळ

SCROLL FOR NEXT