Jalyukt Shiwar Scam Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Jalyukt Shiwar : जलयुक्त शिवार अभियानासाठी जिल्हास्तरीय समिती स्थापन

राज्य शासनाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियान २.० राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात आली असून नुकतीच या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली.

Team Agrowon

पुणे : राज्य शासनाच्या निर्देशानुसार जलयुक्त शिवार अभियान २.० (Jalyukt Shiwar Scheme) राबविण्यासाठी जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख (Dr. Rajesh Deshmukh) यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती (Committee For Jalyukt Shiwar) स्थापन करण्यात आली असून नुकतीच या समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली.

बैठकीस उपजिल्हाधिकारी वनश्री लाभशेटवार, जलसंधारण विभागाच्या कार्यकारी अभियंता सुजाता हांडे आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. देशमुख यांनी अभियानाच्या बालबद्ध आराखड्यास बैठकीत मान्यता दिली.

अटल भूजल योजनेतील आणि टँकरग्रस्त गावे प्राधान्याने घेण्यात यावीत. अभियानाला गती देण्यासाठी तालुकास्तरावर समिती स्थापन करून गावांची निवड करावी, असे निर्देश त्यांनी या वेळी दिले.

जलसंधारण अधिकारी ऋतुजा ढगे यांनी जलयुक्त शिवार अभियान २.० बाबत माहिती दिली. या वेळी पाणलोट विकासाची कामे पूर्ण झालेली गावे, अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी कामांची व्याप्ती, गाव आराखडा, घेण्यात येणारी कामे, कामांसाठी मान्यता, कामांचा प्राधान्यक्रम, जलपरिपूर्णता अहवाल, जलसाक्षरता व प्रशिक्षण आदी विविध विषयांचा आढावा घेण्यात आला.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmer Loan: शेतकऱ्यानं जीवन संपवल्यास बँका जबाबदार- महसूलमंत्री बावनकुळे

Sita Herbal Farm: अल्पभूधारक महिलांच्या ‘सीता हर्बल फार्म’ची वनौषधी उद्योगापर्यंत झेप

Crop Insurance Compensation: शेतकऱ्यांचे डोळे पीक विमा भरपाईकडे

Agricultural Cost Inflation: येत्या वर्षातही वाढणार शेतीवरील खर्च, खाद्य महागाई

Horoscope 5 October 2026 : कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना कराल

SCROLL FOR NEXT