Farmer Loan Waive Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Scheme : पन्नास हजार शेतकरी‘प्रोत्साहन’च्या प्रतीक्षेत

राज्य सरकारने वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान जाहीर केल्याप्रमाणे ८४ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली.

टीम ॲग्रोवन

सातारा : राज्य सरकारने वेळेत कर्ज परतफेड (Loan Repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांना ५० हजारांचे प्रोत्साहन अनुदान (Incentive Subsidy) जाहीर केल्याप्रमाणे ८४ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर केली. त्यानुसार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यास सुरुवात केली. पण या यादीतही शासकीय नोकर कर्जमाफीत (Farmer Loan Waive) बसलेल्या शेतकऱ्यांची नावे आल्याने यादी थांबविली.

त्यामुळे पहिल्या यादीतील केवळ ३४ हजार शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. उर्वरित ५० हजार शेतकरी अद्याप अनुदानापासून वंचित आहेत. त्यांचा प्रश्‍न सुटल्याशिवाय दुसरी यादी जाहीर होणार नाही. त्यामुळे प्रतीक्षेतील शेतकऱ्यांना एक डिसेंबरपर्यंत प्रतीक्षा करावी लागेल.

वेळेत कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला होता. मात्र कोरोनाच्या महामारीमुळे त्यांना पैसे जमा करता आले नाहीत. तोपर्यंत महाविकास आघाडीचे सरकार सत्तेतून पायउतार होऊन शिंदे-फडणवीस सरकार सत्तेत आले. त्यांनी महाविकास आघाडी सरकारने घेतलेला हा निर्णय शेतकऱ्यांसाठी पुढे चालू ठेवण्याचा निर्णय घेतला.

जिल्ह्यातील साडेतीन लाख शेतकरी यासाठी पात्र ठरले. त्यापैकी टप्प्याटप्प्याने हे पैसे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्‍याचा निर्णय घेतला. त्यानुसार जिल्ह्यातील ८४ हजार शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर झाली. त्यातील शेतकऱ्यांना बॅंक खाते आधारशी लिंक करूनच पैसे जमा करण्यास सुरुवात केली. त्यानुसार ३४ हजार शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले गेले.

महिनाभराचा कालावधी लागणार

दरम्यान, या यादीत कर्जमाफी मिळालेले काही शेतकरी तसेच शासकीय नोकरदारांचा समावेश झाला. त्यामुळे पुढची यादी थांबवून या यादीतील त्रुटी दूर करण्याची प्रकिया सुरू केली आहे. आता या त्रुटी दूर होऊन पुन्हा उर्वरित शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान दिले जाईल. त्यानंतर दुसरी पात्र यादी जाहीर होईल. त्यासाठी महिनाभराचा कालावधी लागणार आहे. डिसेंबरमध्ये दुसरी यादी जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना थोडी वाट पाहावी लागणार आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT