Crop Loan Scheme
Crop Loan Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

NAMO Scheme : ‘नमो’चा शेतकऱ्यांना मेअखेर लाभ

Team Agrowon

PM Yojana : प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेच्या (PM Kisan) धर्तीवर महाराष्ट्र सरकारची ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजना (Namo Shetkari Mahasanman Nidhi Yojana) यंदा सुरू होणार आहे. शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दर चार महिन्यांतून एकदा दोन हजार रुपये, असे वर्षात तीन हप्त्यांत सहा हजार रुपये मिळणार आहेत. मेअखेरीस पहिला हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे.

केंद्र सरकारच्या योजनेप्रमाणेच राज्याच्या योजनेचे निकष आहेत. प्राप्तिकरदाते, सरकारी नोकरदार, लोकप्रतिनिधींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. दुसरीकडे, १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी ज्यांच्या नावे शेतजमीन आहे, तेच योजनेसाठी पात्र असतील.

मात्र, पीएम किसान सन्मान निधीचा दोन हजार रुपयांचा हप्ता ज्या बँक खात्यावर जमा होतो, ते बँक खाते आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक करणे बंधनकारक आहे.

राज्यातील १२ लाख शेतकरी असे आहेत, की ज्यांचे बँक खाते अजूनही आधार नंबर आणि मोबाईल नंबरशी लिंक नाही. अशा शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते लिंक करून घ्यावे; अन्यथा त्यांना या योजनेचे पैसे मिळू शकणार नाहीत.

वर्षाला लागतील १६०० कोटी

राज्य सरकारने केंद्राकडूनही राज्यातील शेतकरी लाभार्थींची माहिती मागविली आहे. केंद्र सरकारचा चौदावा हप्ता व महाराष्ट्र सरकारचा पहिला हप्ता आता मेअखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांना मिळणार आहे. राज्यात जवळपास ८३ लाख लाभार्थी आहेत. वार्षिक एक हजार ६६० कोटींची तरतूद करावी लागणार आहे.

या बाबी बंधनकारक

१ फेब्रुवारी २०१९ पूर्वीचा जमीनधारक शेतकरीच पात्र सन्मान निधी मिळवण्यासाठी लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी करावी लागेल. लाभार्थीने त्याच्या नावावरील मालमत्ता नोंदीची माहिती द्यावी.

बॅंक खात्याला आधार लिंक करून घेणे बंधनकारक

पीएम किसान योजनेतील लाभार्थीच ‘नमो शेतकरी महासन्मान निधी’ योजनेसाठी पात्र असतील. ज्या शेतकरी लाभार्थींनी त्यांचे आधार बॅंक खात्याशी संलग्न केलेले नाही, त्यांनी तत्काळ करून घ्यावे. मेअखेरीस तथा जुलैमध्ये या योजनेचा पहिला हप्ता पात्र शेतकऱ्यांना मिळणार आहे.

- सुनील चव्हाण, आयुक्त, कृषी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon Podcast : सोयाबीनमध्ये काहीशी सुधारणा; कापूस, सोयाबीन, हरभरा, कांदा यांचे काय आहेत दर ?

APMC Market : ढोलबारेत खासगी बाजार समिती सुरू

Gokul Milk Sangh : उन्हाळ्यात गोकुळची दूध क्रांती, तब्बल २ लाख लिटरने संकलन वाढलं

Onion Auction : मुंगसे उपबाजार आवारात अखेर कांद्याचे लिलाव सुरू

Agriculture Update : शेतकऱ्यांना बियाणे, खते योग्यवेळी उपलब्ध करून द्या

SCROLL FOR NEXT