Namo Farmer Mahasanman Scheme : हिंगोलीत ‘नमो’ योजनेचा १ लाखावर शेतकऱ्यांना लाभ

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ८३३ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.
Farmer Scheme
Farmer SchemeAgrowon

Hingoli News : नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत (Namo Farmer Mahasanman Fund Scheme) हिंगोली जिल्ह्यातील १ लाख ९५ हजार ८३३ शेतकऱ्यांना लाभ मिळणार आहे.

केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री शेतकरी सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर राज्यात देखील नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेची घोषणा राज्याच्या अर्थसंकल्पाद्वारे जाहीर केली आहे.

Farmer Scheme
Women ST Bus Concession : ‘महिला सन्मान’चा तीन लाख महिला प्रवाशांनी घेतला लाभ

त्यात हिंगोली तालुक्यातील ३४ हजार ८८२ शेतकरी, कळमनुरी तालुक्यातील ३८ हजार ८६० शेतकरी, वसमत तालुक्यातील ४३ हजार ०३ शेतकरी, औंढा नागनाथ तालुक्यातील ३४ हजार ४२५ शेतकरी, सेनगाव तालुक्यातील ४४ हजार ६६३ शेतकरी असे जिल्ह्यातील पात्र एकूण १ लाख ९५ हजार ८३३ शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे.

या योजनेतंर्गत जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी दरवर्षी केंद्र शासन आणि राज्य शासनाकडून प्रत्येकी ११७ कोटी ४९ लाख ९८ हजार रुपये असा एकूण २३४ कोटी ९९ लाख ९६ हजार एवढा निधी प्राप्त होणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com