Pm Kisan  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : ‘पीएम किसान योजनेच्या लाभासाठी शेतकऱ्यांनी ई-केवायसी करावी’

PM Kisan Scheme Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

Team Agrowon

PM Kisan Yojana Update : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांना किसान सन्मान योजनेचा लाभ अखंडितपणे मिळावा यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी ई-केवायसी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी मनीषा खत्री यांनी केले आहे.

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत १४ व्या हप्त्याचे वितरण करण्यात येणार आहे. यासाठी १ मेपासून गावपातळीवर सर्वत्र मोहीम राबवून ई-केवायसीसाठी सामाजिक सुविधा केंद्र (सीएससी) व बँक खाती आधार संलग्न करण्यासाठी इंडिया पोस्ट पेमेंट बँक (आयपीपीबी) यांच्या समन्वयाने कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत.

केंद्र शासनाने पीएम किसान पोर्टलवर शेतकरी सदरात ओटीपीच्या आधारे, तसेच सामाईक सुविधा केंद्रामध्ये व अँड्रॉइड मोबाईलवर पीएमकिसान ॲपवरसुद्धा ई-केवायसीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे.

या सुविधेमुळे लाभार्थ्यांना स्वत:सह अन्य ५० लाभार्थ्यांचेही ई-केवायसी प्रमाणिकरण करता येणार आहे. पीएम सन्मान योजनेचा अखंडित लाभ घेता यावा यासाठी पात्र लाभार्थ्यांना ई-केवायसीसाठी आपले आधारकार्ड घेऊन सीएससी सेंटर, आपले सरकार सेवा केंद्रावर, तसेच नजीकच्या पोस्ट कार्यालयात जाऊन ई-केवायसी करावी.

जे शेतकरी ई-केवायसी करतील, त्यांनाच यापुढे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी ई-केवायसी करावी, असे आवाहन श्रीमती खत्री यांनी प्रसिद्धी पत्रकान्वये केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shiv Sena Split Case: शिंदेंनी कोणत्या आधारे 'मुख्य नेता' पद स्वतःला बहाल केलं? ठाकरेंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद

Rain Damage Compensation: अतिवृष्टीग्रस्तांसाठी ३९ कोटींच्या निधी वाटपाला गती

Krantisinha Nana Patil Award : क्रांतिसिंह नाना पाटील पुरस्कार’ राजू देसले यांना

Farmers Loan Waiver: शेतकऱ्यांची कर्जमुक्तीकडे वाटचाल

Koyna Dam Water : कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग पूर्णपणे बंद

SCROLL FOR NEXT