Animal Husbandry’ schemes Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Animal Husbandry Scheme : पशुसंवर्धन विभागातर्फे ‘जत्रा शासकीय योजनांची’

कुक्कुटपालन प्रक्षेत्राची नोंदणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालन व्यवसाय करणारे पशुपालक, शेतकरी यांच्याकडे असलेले मांसल पक्ष्यांचे तसेच अंडी देणाऱ्या पक्ष्यांच्या प्रक्षेत्राची नोंदणी करून घेता येईल.

Team Agrowon

Parbhani News राज्य शासनाच्या ‘जत्रा शासकीय योजनांची’ (Government Scheme) या अभियानांतर्गत पशुसंवर्धन विभागामार्फत देण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजनांमध्ये कृत्रिम रेतन, सेवादाता, कुक्कुटपालन व्यावसायिक, शेतकरी, गोपालक, शेळीपालक व्यावसायिकांनी सहभाग नोंदवून लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी. पी. नेमाडे यांनी केले आहे.

कुक्कुटपालन प्रक्षेत्राची नोंदणी योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालन व्यवसाय करणारे पशुपालक, शेतकरी यांच्याकडे असलेले मांसल पक्ष्यांचे तसेच अंडी देणाऱ्या पक्ष्यांच्या प्रक्षेत्राची नोंदणी करून घेता येईल. या नोंदणीसाठी पशुपालकांनी आपल्या प्रक्षेत्राची संपूर्ण माहिती देणे अपेक्षित आहे.

शेळीपालन, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत परभणी जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याला मानव विकास योजना, नावीन्यपूर्ण योजना, विशेष घटक योजना, आदिवासी क्षेत्राबाहेरील आदिवासी उपयोजनेअंतर्गत निवड केलेले लाभार्थी, बचत गटाचे लाभार्थी, सधन कुक्कुटपालन व पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय यांच्यासाठी प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहेत.

पशुपालकांच्या जनावरांचा विमा व पशुस्वास्थ दाखला वाटप आदी विविध योजनेअंतर्गत वाटप करण्यात येणाऱ्या पशुपालकाच्या जनावरांचा पशुस्वास्थ दाखला देऊन त्यांचा विमा उतरविण्यात येईल.

किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत पशुपालनाशी निगडित असलेल्या शेळीपालन, गायी, म्हशी व कुक्कुटपालन आदी व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांना किसान क्रेडिट कार्ड योजनेअंतर्गत बँकेमार्फत कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल, त्यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी व अर्ज भरून देणे गरजेचे असल्याचे डॉ. नेमाडे यांनी सांगितले.

याशिवाय नकुल पशुस्वास्थ कार्ड नोंदणी योजनेअंतर्गत शेतकरी, पशुपालक यांच्याकडे असलेले गोवंशीय पशुधन गायी, म्हशी, संकरित जनावरे, बैल यांना स्वतंत्रपणे पशुस्वास्थ कार्ड देण्यात येते.

यामध्ये जनावरांचा १२ अंकी ओळख क्रमांक, लसीकरण, कृत्रिम रेतन व आरोग्यविषयक इतर आनुषंगिक बाबींची नोंदणी, तपशील असलेले पशुस्वास्थ कार्ड शेतकऱ्यांना वाटप करण्यात येणार आहे.

या वरील सर्व योजनांची अधिकची माहिती संबंधित तालुक्याच्या पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांच्याकडे असून, योजनेसाठी नोंदणी अर्ज तसेच प्रशिक्षणाचे वेळापत्रकाबाबत त्यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. पी. पी. नेमाडे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. नामदेव आघाव यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lucerne Fodder: एकदा लागवड, तीन वर्षे चारा! पशुपालकांसाठी लसूणघास फायदेशीर

Fruit Insurance Refund: फळ पीकविमा परतावा अप्राप्त

Rabies Prevention Tips: रेबीज रोखण्यासाठी लसीकरणासह जनजागृती आवश्यक

Water Storage: प्रकल्प सलग सातव्या वर्षी १०० टक्के भरले

Fruit Crop Insurance: फळपीक विम्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

SCROLL FOR NEXT