Incentive Subsidy Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Incentive Subsidy : शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान मिळवण्यासाठी प्रयत्न करू

जगात आणि देशात झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे आजचे विद्यार्थी स्मार्ट झाले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचणारी माहिती किती खरी, किती खोटी हे ओळखण्याकरिता आजचे विद्यार्थी दुर्दैवाने कमी पडतात.

Team Agrowon

Kolhapur News : महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) काळात आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी (Farmer Loan Waive), शून्य टक्के दराने पीक कर्ज (Crop Loan), प्रामाणिक शेतकऱ्यांना प्रोत्साहन अनुदान (Farmer Incentive Subsidy) देण्याचे निर्णय घेतले. प्रोत्साहन अनुदानापासून अजूनही काही शेतकरी वंचित राहिले आहेत.

या शेतकऱ्यांना अनुदान मिळवण्यासाठी डी.डी.आर.च्या मागे लागून प्रयत्न करू, असे प्रतिपादन राज्याचे विरोधी पक्षनेते व माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केले.

केनवडे (ता. कागल) येथील प्राथमिक शाळेत उभारण्यात आलेल्या एक कोटींच्या फ्युच्युरिस्टिक क्लासरूमच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी आमदार हसन मुश्रीफ होते. प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सतेज पाटील, आमदार राजेश पाटील, माजी आमदार संजय घाटगे उपस्थित होते.

पवार म्हणाले, की जगात आणि देशात झालेल्या डिजिटल क्रांतीमुळे आजचे विद्यार्थी स्मार्ट झाले आहेत. इंटरनेटच्या माध्यमातून पोहोचणारी माहिती किती खरी, किती खोटी हे ओळखण्याकरिता आजचे विद्यार्थी दुर्दैवाने कमी पडतात.

सोशल मीडियावर येणारी प्रत्येक माहिती खरी की खोटी याची शहानिशा करायला विद्यार्थ्यांनी शिकले पाहिजे. येणारी प्रत्येक माहिती बरोबरच आहे, असे समजू नका.

या माहितीबाबत क्रॉस चेक करा. खोटी माहिती लक्षात आली तर ती फॉरवर्ड न करता तिथेच खंडित करा. चुकीच्या माहितीमधून समाजामध्ये होणारे गैरसमज, द्वेष पसरवणार नाहीत. देशाची एकता, अखंडता बाधित होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे.

प्रास्ताविक माजी सरपंच दत्ता पाटील केनवडेकर यांनी केले. आमदार हसन मुश्रीफ, आमदार सतेज पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास माजी आमदार के. पी. पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, संताजी शुगरचे चेअरमन नविद मुश्रीफ, सरपंच अनुराधा शिंदे, उपसरपंच शुभांगी पाटील, उत्तम वाडकर, मुख्याध्यापक सुनील चौगुले व ग्रामस्थ उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Dhule Administration Plan: धुळे जिल्ह्यात ३२९ गावांसाठी दोन कोटींचा आराखडा

Akola Development Plan: अकोला जिल्हा नियोजन समितीचा ३५२ कोटींचा आराखडा मंजूर

Heritage Trees: हजारो पावसाळे बघितलेली प्राचीन झाडे

Indian Agriculture: हवामान बदल आणि असमानतेच्या गर्तेत खेडी

Interview with Amit Keval Patil: समूह शेती, ‘एआय’ची कास धरावीच लागेल

SCROLL FOR NEXT