PM Kisan
PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी ई-केवायसी आवश्यक

टीम ॲग्रोवन

नाशिक : प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (PM Kisan Snman Scheme) (पी.एम किसान) पोर्टलवरील नोंदणीकृत पात्र लाभार्थ्यांची ई-केवायसी (PM Kisan e-KYC) करण्यासाठी यापूर्वी विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात आली आहे. त्यानुसार लाभार्थी शेतकऱ्यांच्या खात्याचे ई-केवायसी करण्याच्या सूचना केंद्र शासनाने दिल्या. योजनेसाठी लाभ मिळण्यासाठी ई-केवायसी आवश्यक आहे. त्यासाठी कामकाज पूर्ण करण्यासाठी आवाहन करण्यात आले असून मुदत ३१ ऑगस्ट अखेर असणार आहे.

केंद्र शासनाने पंतप्रधान किसान योजना केली आहे. त्यात,साधारण चार महिन्याला दोन हजार याप्रमाणे वर्षाला सहा हजार रुपये मदत दिली जाते. त्यानुसार सगळ्या खातेदारांचे सात बारा खाते आणि बॅक खाते जोडले आहे. मात्र त्यात, अनेकांच्या खात्याचे ई-केवायसी झालेली नाही. जिल्ह्यात २ लाख १८ हजार (४८ टक्के) खातेदार शेतकऱ्यांचेच ई -केवायसी झालेले आहे. त्यातच आता केंद्र शासनाने शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी ई-केवायसी असणे आवश्यक केल्याने यापुढे ती करणे गरजेचे ठरणार आहे.

देशात सगळ्या जिल्ह्यांना केंद्र शासनाने तशा सूचना दिल्या आहेत.बहुतांश भागात १५ ऑगस्टला अखेरचा हप्ता जमा झाला आहे. मात्र त्याचवेळी येत्या ३१ ऑगस्टपर्यंत सगळ्या शेतकऱ्यांचे इकेवायसी करावे लागणार आहे. त्यासाठी जिल्हा यंत्रणा सतर्क झाली आहे. अशातच राज्यात तलाठी व इतर संवर्गातील कर्मचाऱ्यांचे आंदोलन सुरु असल्याने अपुऱ्या मनुष्यबळाच्या जोरावर प्रशासकीय यंत्रणेला शंभर टक्के शेतकऱ्यांचे इ-केवायसी करण्याचे मोठे आव्हान आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी गंगाथरण डी यांनी शेतकऱ्यांनी इ केवायसी करण्याचे आवाहन केले आहे.

केंद्र शासनाच्या निर्देशानुसार आता शेतकऱ्यांचे ईकेवायसी गरजेचे आहे. शासनाने शंभर टक्के इकेवायसी करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे जिल्ह्यात अधिकाधिक शेतकऱ्यांनी ई-केवायसी करून घ्यावेत.
गंगाथरन डी, जिल्हाधिकारी, नाशिक

अशी करता येईल ई-केवायसी ई-केवायसी करण्यासाठी ओटीपी किंवा बायोमेट्रिक हे पर्याय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. https://pmkisan.gov.in या वेबसाईटवरील Farmer Comer या टॅब मध्ये किंवा पी.एम.किसान अपव्दारे ओटीपी लाभार्थ्यांना स्वतः प्रमाणीकरण मोफत करता येईल. ग्राहक सेवा केंद्रावर ई प्रमाणीकरण बायोमॅट्रीक पध्दतीने करता येईल.केंद्र शासनाकडून ग्राहक सेवा केंद्र केंद्रावर बायोमेट्रीक पध्दतीने ई-केवायसी प्रमाणीकरण करण्यासाठी प्रती लाभार्थी बायोमेट्रिक प्रमाणीकरण दर १५ रुपये निश्चित करण्यात आला आहे.

योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना पुढील लाभ प्राप्त होण्यासाठी प्रमाणीकरणाची प्रक्रिया ३१ऑगस्टपर्यंत करण्याचे बंधनकारक करण्यात आले आहे. मुदतीत प्रक्रिया पूर्ण न करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना पी.एम.किसान सन्मान निधोच्या पुढील हत्याचा लाभ दिला जाणार नाही असे निर्देश असल्याचे नाशिक तहसिलदार अनिल दौंडे यांनी कळविले आहे. ---------- एकूण खातेदार....४,५०,००० ई केवायसी पूर्ण ..२,१८,००० ई केवायसी बाकी ..२,३२,०००

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Leopard Attack : राधानगरीत बिबट्याचा हल्ल्यात गाय ठार, धनगरवाड्यात भितीचे वातावरण

Pulses Market : महाडला देशी कडधान्ये तेजीत

Water Issue : योजना सुरू, पण लाभ क्षेत्रातील तलाव कोरडे

Agrowon Podcast : मक्याला काय भाव मिळतोय? कापूस, सोयाबीन, गहू, टोमॅटो यांचे दर काय आहेत?

Sugar Quota : मे महिन्यात साखरेचा कोटा वाढला, घाऊक बाजारात मंदीची लाट

SCROLL FOR NEXT