PM kisan : राज्यभर ‘पीएम-किसान’ची ‘केवायसी’ पडताळणी सुरू

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील अजून ४५ लाख शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करावी लागेल.
PM Kisan Yojna News
PM Kisan Yojna NewsAgrowon

पुणे ः पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी (पीएम किसान) योजनेतील (Pm Kisan Scheme) अजून ४५ लाख शेतकऱ्यांना ई-केवायसी (PM Kisan e-KYC) पूर्ण करावी लागेल. ३१ जुलैपूर्वी पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच पुढील हप्ता (Pm Kisan Installment) मिळणार असून, राज्यभर पडताळणीचे काम सुरू आहे, असे कृषी विभागाने म्हटले आहे.

शेतकऱ्यांना ई-केवायसीची सुविधा सुविधा मोफत आहे. मात्र सामाईक सुविधा केंद्रात शुल्क भरून ई-केवायसी पूर्ण करता येईल. या योजनेतील पात्र शेतकरी कुटुंबाला प्रति हप्ता दोन हजार रुपये याप्रमाणे तीन हप्त्यांत एका वर्षात सहा हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. आतापर्यंत राज्यातील १०९.९७ लाख शेतकऱ्यांना २० हजार १८७ कोटी रुपयांपेक्षा जास्त मदत प्रत्यक्ष बॅंक खात्यात जमा करण्यात आलेली आहे.

PM Kisan Yojna News
PM Kisan: शेतकऱ्यांना २१ हजार कोटी रूपयांचे वाटप

या योजनेतील पुढील हप्ता वितरित करण्याबाबत देशभर कामकाज सुरू आहे. मात्र केंद्राच्या सूचनेनुसार आता शेतकऱ्यांच्या ई-केवायसीची पडताळणी सक्तीची आहे. ३१ जुलैपर्यंत पडताळणी झालेल्या शेतकऱ्यांनाच पुढील हप्ता मिळणार असल्याचे केंद्र शासनाचे स्पष्ट केलेले आहे. त्यामुळे शेतकरी स्वतः शक्य असल्यास पीएम किसानच्या pmkisan.gov.in या संकेतस्थळावर मोफत ई-केवायसी करू शकतात. सामाईक सुविधा केंद्रातूनदेखील पडताळणीची सुविधा देण्यात आलेली आहे. पीएम-किसान योजनेत २२ जुलैअखेर ६१.३३ लाख शेतकऱ्यांची ई-केवायसी पडताळणी पूर्ण झालेली आहे.

PM Kisan Yojna News
PM Kisan : पंतप्रधान सन्मान योजनेच्या ‘ई-केवायसी’चे सर्व्हर डाउन

कृषी गणना उपायुक्त विनयकुमार आवटे यांच्या म्हणण्यानुसार, पीएम किसान स्थळावर पडताळणीची प्रक्रिया पूर्ण करताना शेतकऱ्यांना त्यांच्या आधार क्रमांकाशी संलग्न केलेला भ्रमणध्वनी वापरावा लागेल. या भ्रमणध्वनीवर येणाऱ्या ओटीपीच्या आधारे पडताळणी करता येईल. त्यासाठी कोणतीही शुल्क आकारणी केली जाणार नाही.

प्रतिलाभार्थी केवळ १५ रुपये शुल्क

कृषी गणना उपायुक्त विनयकुमार आवटे यांच्या म्हणण्यानुसार, ऑनलाइन पडताळणी शक्य नसल्यास शेतकरी सामाईक सुविधा केंद्रात (सीएससी) जाऊ शकतात. तेथे बायोमेट्रिक पद्धतीद्वारे पडताळणीची सुविधा उपलब्ध असेल. यासाठी सामाईक सुविधा केंद्राकडून प्रतिलाभार्थी केवळ १५ रुपये शुल्क आकारले जाणार आहे.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com