Crop Loan
Crop Loan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Loan Scheme : नियमित परतफेड करणाऱ्यांना २६ कोटींच्या लाभाचे वितरण

Team Agrowon

Crop Loan In Nandurbar : महात्मा फुले शेतकरी कर्जमुक्ती प्रोत्साहनपर योजनेत कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या पाच हजार ७५५ शेतकऱ्यांना २६ कोटी १९ लाख रुपयांचा लाभ देण्यात आला. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत एक लाख १२ हजार शेतकऱ्यांना १३ हप्त्यांचे वितरण झाले, असे प्रतिपादन पालकमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांनी येथे केले.

महाराष्ट्रदिनी ते बोलत होते. ते म्हणाले, की नंदुरबार हा शेतीप्रधान जिल्हा आहे. ‘शेतकरी सुखी तर जग सुखी’ असे म्हटले जाते. त्याप्रमाणे संपूर्ण जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी सुखी आणि समाधानी कसा राहील यासाठी शासनाने विविध योजना हाती घेतल्या आहेत.

जिल्ह्यात चालू खरीप हंगामासाठी दोन लाख ८८ हजार ४६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे उद्दिष्ट असून, त्यासाठी २१ हजार ५७४ क्विंटल बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ८७ हजार ९९० टन रासायनिक खतांचे आवंटन मंजूर करण्यात आले आहे.

गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजनेत २४ शेतकऱ्यांच्या वारसांना ४८ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आले आहे.

गेल्या वर्षी सप्टेंबर, ऑक्टोबर २०२२ दरम्यान झालेला अवकाळी पाऊस, अतिवृष्टी, गारपीट, वादळ यामुळे बाधित नुकसानग्रस्त १०७ शेतकऱ्यांना मदत देण्यात आली आहे. मार्च २०२३ मध्ये चार हजार ७३० हेक्टरसाठी आठ कोटी, १३ लाख २३ हजारांची मदत सरकारतर्फे वितरित केली जाणार आहे.

जिल्ह्यातील एकही माणूस उपाशी राहू नये या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शिवभोजन थाळीचे मार्च २०२३ अखेरपर्यंत चार लाख ९९ हजार ७५५ इतके वितरण झाले आहे.

दिवाळी, गुढीपाडवा व डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त चार लाख ८३ हजार केसरी शिधापत्रिकाधारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात आला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Kolhapur River Pollution : पंचगंगा जलपर्णीच्या विळख्यात, गढूळ पाण्याचा दुर्गंध, प्रदुषण नियंत्रण मंडळ करतय काय?

Village Development : शेती प्रयोगशीलता अन ग्रामविकास...

Panchayat Development Index : पंचायत विकास निर्देशांक

Vegetable Market : कडक उन्हाचा पालेभाज्यांवर परिणाम, मार्केटमध्ये आंबेच आंबे

Agriculture Import : आयातीत कसली आत्मनिर्भरता?

SCROLL FOR NEXT