Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : उर्वरित पीकविमा वाटप करा, अन्यथा आंदोलन

नांदेड जिल्ह्याला खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीकडे दाखल केली.

Team Agrowon

Nanded Crop Loan News : मागील खरिपातील नुकसानग्रस्तांना प्रधानमंत्री पीकविमा (Crop Insurance Scheme) मंजूर आहे. परंतु विमा कंपनीकडून विहित मुदतीत तो वितरित केला नाही.

यामुळे शेतकरी पत्र संघर्ष समितीने शेतकऱ्यांच्या खात्यावर ता. २० फेब्रुवारीपूर्वी पैसै टाकावे, अन्यथा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याच्या इशारा समितीचे बालाजी पाटील ढोसणे, बालाजी पाटील सांगवीकर यांनी दिला आहे.

नांदेड जिल्ह्याला खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यामुळे प्रधानमंत्री पीकविमा योजनेत सहभाग घेतलेल्या शेतकऱ्यांनी नुकसानीची पूर्वसूचना (Crop Damage Intimation) विमा कंपनीकडे दाखल केली. पंचनामे पण झाले, परंतु एक महिना होऊनही विमा कंपनी केंद्राकडे बोट दाखवत आहे.

विमा नुकसान भरपाई म्हणून नैसर्गिक आपत्तीचे ९७ कोटी व काढणीपश्‍चातचे ३ कोटी असे एकूण १०१ कोटी रुपये, तर २५ टक्के आगाऊ रक्कमेचे जवळपास ५७ कोटी रुपये युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी वाटप केले नाहीत.

ही रक्कम २० फेब्रुवारीपूर्वी वाटप करा, अन्यथा सर्व शेतकऱ्यांना घेऊन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे बालाजी पाटील ढोसणे, बालाजी पाटील सांगवीकर, सांगवीचे सरपंच योगेश गायकवाड यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रविशंकर चलवदे यांना निवेदनाद्वारे दिला आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT