Crop Insurance Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविम्याच्या मुद्द्यावर लक्ष घालण्याची मागणी

शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची अत्यल्प रक्कम जमा करणाऱ्या एआयसी कंपनीने आपली कार्यालये बंद ठेवल्याने शेतकऱ्यांनी तक्रारी कुठे करायच्या, असा पेच निर्माण झाला आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा ः शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविम्याची (Crop Insurance) अत्यल्प रक्कम जमा करणाऱ्या एआयसी कंपनीने आपली कार्यालये बंद ठेवल्याने शेतकऱ्यांनी तक्रारी कुठे करायच्या, असा पेच निर्माण झाला आहे.

राज्य सरकारने हस्तक्षेप करून तोडगा काढावा, अशी मागणी स्वाभिमानीचे नेते रविकांत तुपकर (Ravikant Tupkar) यांनी केली. त्यांनी गुरुवारी (ता. १) राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांची भेट घेऊन निवेदन दिले.

गेल्या दोन दिवसांपासून पीकविमा कंपन्यांनी यावर्षीच्या पीकविम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करायला सुरुवात केली आहे. परंतु शेतकऱ्यांच्या खात्यात अत्यंत तोकडी रक्कम जमा करून शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली आहे.

भरलेल्या प्रीमियम पेक्षाही कमी रक्कम शेतकऱ्यांना मिळाली आहे. विमा कंपन्यांनी अनेक ठिकाणी कृषी विभागाच्या नुकसानीचे सर्व्हे पंचनामे बाजूला ठेवून स्वतःच्या मनाने कमी नुकसान दाखवून शेतकऱ्यांचे फॉर्म दाखल केले आहेत. वास्तविक कंपन्यांनी वस्तुनिष्ठ संयुक्त सर्वे ग्राह्य धरून नुकसान भरपाई देणे गरजेचे होते.

शेतकरी पैसे कमी आल्याच्या तक्रारी घेऊन विमा कंपनीच्या कार्यालयात जात आहे. पण कार्यालये बंद असल्याने तक्रार कोणाकडे करायची, हा प्रश्‍न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता कंपनी व शेतकऱ्यांमध्ये संघर्ष निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न उद्‍भवण्याची चिन्हे आहेत. तरी सरकारने या प्रकरणात हस्तक्षेप करावा, अशी मागणीही त्यांनी केली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT