Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : साडेपाच लाख शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा

Crop Insurance Scheme : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे.

Team Agrowon

Sangli News : पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत आता शेतकऱ्यांना एक रुपयात पीकविमा मिळणार आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली आहे. जिल्ह्यातील सुमारे ६ लाख ५२ हजार शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.

या वर्षीच्या खरीप हंगामापासून करण्यात आली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी ३१ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक कुंभार यांनी केले.

शेतकऱ्यांनी केवळ एक रुपया भरून विमा पोर्टलवर नोंदणी करणे आवश्यक आहे. पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी भरावयाचा विमा हप्ता हा केंद्र शासनाने हंगामासाठी दोन टक्के, रब्बी हंगामासाठी १.५ टक्का, तसेच खरीप व रब्बी हंगामातील नगदी पिकांसाठी पाच टक्के मर्यादेत ठेवला आहे.

ही योजना केवळ अधिसूचित केलेल्या क्षेत्रातील केवळ अधिसूचित पिकांसाठी लागू करण्यात आली आहे. ती ऐच्छिक आहे. शेतकऱ्याव्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरीही या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. या योजनेअंतर्गत सर्व पिकासाठी ७० टक्के जोखिमस्तर निश्‍चित करण्यात आला आहे.

जिल्ह्यातील भात, खरीप ज्वारी, बाजरी, तूर, मका, भुईमूग, सोयाबीन, मूग, उडीद या पिकांसाठी जिल्ह्यात योजना लागू आहे.

समाविष्ट पीकनिहाय तालुके

भात (जि) - वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा. खरीप ज्वारी - मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, आटपाडी, कवठेमहांकाळ. बाजरी - मिरज, जत, खानापूर, तासगाव, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठेमहांकाळ. तूर - जत. मका - मिरज, वाळवा, जत, खानापूर,

तासगाव, पलूस, कडेगाव, आटपाडी, कवठे महांकाळ. उडीद - मिरज, जत, खानापूर, तासगाव, कडेगाव, कवठे महांकाळ. मूग - मिरज, जत, खानापूर, तासगाव, कडेगाव, कवठे महांकाळ. भुईमूग - मिरज, जत, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, कवठे महांकाळ. सोयाबीन - मिरज, खानापूर, वाळवा, तासगाव, पलूस, कडेगाव, शिराळा, कवठे महांकाळ. कापूस - आटपाडी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Land Mafia: विद्यापीठांच्या जमिनींवर भूमाफियांचा डोळा

Farmer Crisis: शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे पाप राज्य सरकारने केले

Agriculture Funds: राज्याबरोबर केंद्राचाही ‘कृषी’ला निधी नाही

Farmer Electricity: शेतकऱ्यांना २४ तास वीज देणार

Maharashtra Winter Weather: थंडी ओसरली, चटका, उकाडा वाढला

SCROLL FOR NEXT