POCRA Shmeme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

POCRA : ‘कृषी व्यवसाय’साठी ‘पोकरा’कडून वर्षाची अट

नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा) शेतकरी उत्पादक कंपनी तसेच शेतकरी गटांना कृषी व्यवसाय घटका अंतर्गत लाभ घेण्यासाठी प्रकल्प संचालकांनी मार्गदर्शन सूचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत.

कृष्णा जोमेगावकर

नांदेड : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पात (पोकरा) (POCRA Project) शेतकरी उत्पादक कंपनी (Farmer Producer Company) तसेच शेतकरी गटांना कृषी व्यवसाय घटका अंतर्गत लाभ घेण्यासाठी प्रकल्प संचालकांनी मार्गदर्शन सूचनांमध्ये सुधारणा केल्या आहेत. यात एक वर्ष पूर्ण होऊन लेखापरिक्षण झालेल्याच उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांना लाभ मिळेल. यासह संचालक मंडळातही एका कुटुंबातील एकच व्यक्ती अनिवार्य केल्याने या घटकातून प्रकल्प पूर्ण केलेल्या नवीन कंपन्या, शेतकरी गट अडचणीत आले आहेत.

समुदाय आधारित संस्था बळकट करून अनेक शेतकऱ्यांना एकत्रित लाभ देण्यासाठी केंद्र सरकार शेतकरी उत्पादक कंपन्या, शेतकरी गटांना प्रोत्साहन देत आहे. परंतु दुसरीकडे मात्र अशा कंपन्या, गटांना विविध स्तरावर प्रचंड अडचणीचा सामना करावा लागत आहे. कंपनी स्थापन केल्यानंतर एखादा प्रकल्प अहवाल सादर केल्यास बँकांकडून कर्जासाठी अडवणूक होते.

प्रकल्प उभा करण्यासाठी नोंदणीकृत भाडेकरार करून जागा घेणे अनिवार्य आहे. त्यामुळे ही बाब किचकट, खर्चिक ठरत आहे. यामुळे ‘पोकरा’च्या प्रकल्प संचालकांनी मार्गदर्शक सूचनांमध्ये सुधारणा करून कंपन्यांना घाम फोडला आहे.

मंगळवारी (ता.२३) पोकराचे प्रकल्प संचालक श्याम तागडे यांनी प्रकल्प संचालकांना (आत्मा) पत्र पाठविले. यात त्यांनी कृषी व्यवसाय घटका अंतर्गत लाभ घेण्यासाठी शेतकरी कंपन्या, शेतकरी गट स्थापन झालेल्या तारखेनंतर आठ दिवसात अर्ज येत असल्याचा निष्कर्ष काढला आहे.

थोडक्यात महत्त्वाचे...

‘पोकरा’तून कृषी व्यवसाय घटकाअंतर्गत लाभ देण्यासाठी अर्जदार कंपन्या-गटांना स्थापन झालेल्या दिनांकापासून एक वर्ष पूर्ण झालेले असावे

पात्र कंपन्या, गटांचा एक वर्षाचा लेखापरिक्षण अहवाल आवश्यक

एकाच कुटुंबातील केंद्रित कंपन्या, गटांना लाभ देण्यात येणार नाही

पीएम किसान योजनेच्या कुटुंब पात्रतेनुसार वेगवेगळ्या कुटुंबातील सभासदांचा समावेश अपेक्षित

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Tiger Death : बरडकिन्हीमध्ये आढळला वाघाचा मृतदेह

Borewell Crackdown : बोअरवेल खोदण्यापूर्वीच प्रशासनाचा दणका

Adinath Sugar Factory : ‘आदिनाथ’ची ४५० कोटींची मालमत्ता १२२ कोटींना विकल्याचा आरोप

Panchnama Update : सोलापुरात ३५ टक्के दुष्काळी क्षेत्राचे पंचनामे पूर्ण

Ration Card e-KYC: रेशन कार्डधारकांच्या सवलतीवर गदा

SCROLL FOR NEXT