Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविम्यासाठी जादा शुल्काच्या तक्रारी वाढल्या

Crop Insurance : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांकडून एक रुपयांपेक्षा जादा शुल्क घेत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आता कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी आणखी दुसरे पाऊल टाकले आहे.

Team Agrowon

Pune News : पंतप्रधान पीकविमा योजनेत शेतकऱ्यांकडून एक रुपयांपेक्षा जादा शुल्क घेत असल्याच्या तक्रारी वाढल्यानंतर आता कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांनी आणखी दुसरे पाऊल टाकले आहे. ‘‘तुमच्या जिल्ह्यातील सामुहिक सेवा केंद्रांची (सीएससी) तपासणी करण्याच्या सूचना द्या,” अशा सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना आयुक्तांनी दिल्या आहेत.

एक रुपयात पीकविमा योजना देण्याची घोषणा राज्य शासनाने केलेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कोणत्याही केंद्रावर पीकविम्याचा अर्ज भरताना एक रुपयापेक्षा जास्त शुल्क देऊ नये. कोणी अतिरिक्त शुल्क मागत असल्यास तहसीलदार किंवा कृषी विभागाच्या कार्यालयाच्या निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन आयुक्तांनी केले होते. सध्या राज्याच्या अनेक भागात पुरेसा पाऊस झालेला नाही.

यंदा नैसर्गिक आपत्तीमुळे खरिपाचे नुकसान होण्याची शक्यता जास्त असल्याचे शेतकऱ्यांना वाटते आहे. त्यामुळेच पीकविम्याचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची घाई सुरू आहे. अशा स्थितीत काही गावांमध्ये शेतकऱ्यांकडून भरमसाट पैसे घेत विमाअर्ज भरले जात आहे.

कृषी आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेल्या पत्रात नमुद केले आहे की, पीकविमा योजनेत शेतकऱ्यांच्या वाट्याला येणाऱ्या विमाहप्त्याची रक्कम आता राज्य शासन भरणार आहे.

शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया नाममात्र शुल्क घेत विमा योजनेसाठी नोंदणी करणे अपेक्षित आहे. नोंदणी करण्यासाठी राज्यातील सामुहिक सेवा केंद्रचालकाला प्रतिअर्ज ४० रुपये शुल्क दिले जात आहे. हे शुल्क संबंधित विमा कंपन्या देत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांकडून एक रुपयाव्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क घेता येणार नाही. आपल्या जिल्ह्यातील सर्व सामुहिक सेवा केंद्रांना तशा सक्त सूचना द्याव्यात.

‘नियमांचे पत्रक दर्शनी भागात लावा’

आपापल्या जिल्ह्यातील सामुहिक सेवा केंद्रांची नियमित तपासणी क्षेत्रिय अधिकाऱ्यांकडून होईल, यासाठी आपण कार्यवाही करावी, असेही जिल्हाधिकाऱ्यांना सूचित करण्यात आले आहे. आयुक्तांनी या पत्रात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांनादेखील जिल्हाधिकाऱ्यांप्रमाणेच सूचना दिल्या आहेत.

पीकविम्यासाठी एक रुपये शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त घेऊ नये, असे पत्रक कृषी आयुक्तालयाने जारी केले आहे. हे पत्रक प्रत्येक सामुहिक सेवा केंद्रचालकाने दर्शनी भागात लावावे. तशा सूचना तुम्ही जारी कराव्यात, असे कृषी आयुक्तांनी या पत्रात नमुद केले आहे.

- पीकविम्याचे अर्ज भरण्यासाठी शेतकऱ्यांची घाई

- पीकविम्यासाठी जादा शुल्क घेण्याचे प्रकार

- शेतकऱ्यांनी एक रुपयाव्यतिरिक्त अन्य कोणतेही शुल्क भरू नये

- विमा कंपन्यांकडून सीएसी केंद्रचालकाला प्रतिअर्ज ४० रुपये शुल्क मिळते

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Nana Patole : नाना पटोलेंचा प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा; राहुल गांधी यांची घेणार भेट

Indian Politics : इंडिया आघाडीसह मित्रपक्षही महायुतीच्या विजयाने बेचैन

Import Policy : आयातीचे घातक धोरण

Parliament Winter Session 2024 : आज संसदेचे हिवाळी अधिवेशन; अदानी प्रकरण आणि वक्फ विधेयकामुळे तापमान वाढणार?

Onion Crop : आळेफाटा परिसरात कांदा पीक फुलोऱ्यात

SCROLL FOR NEXT