Crop Insurance : एक रुपयात पिकविम्यासाठी ३१ जुलै शेवटची मुदत

Crop Insurance At one Rupee : चालू खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Solapur News : चालू खरीप हंगामात पंतप्रधान पीकविमा योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन पोर्टल कार्यान्वित करण्यात आले आहे. शेतकऱ्यांनी पीकविमा योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे. त्यापूर्वी अधिकाधिक शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी डी. एस. गावसाने यांनी केले आहे. या वर्षापासून शेतकऱ्यांना केवळ ‘एक रुपया’ भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येणार आहे, हे योजनेचे वैशिष्टय आहे.

गावसाने म्हणाले, ‘‘पंतप्रधान पीक विमा योजना ही सर्व शेतकऱ्यांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार आणि बिगर कर्जदार त्यांच्या इच्छेनुसार यामध्ये सहभागी होऊ शकतात. खातेदारांच्या व्यतिरिक्त कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारे शेतकरी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत.

Crop Insurance
Crop Insurance Scheme : पीक विमा योजनेत ३१ जुलैपर्यंत भाग घ्या

हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे पिकांची पेरणी किंवा लावणी न झाल्यामुळे होणारे नुकसान, खरीप हंगामातील अपुरा पाऊस, हवामानातील इतर घटकांच्या प्रतिकूल परिस्थितीमुळे केवळ अधिसूचित पिकांची सर्वसाधारण क्षेत्राच्या ७५ टक्के पेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी किंवा लावणी न झाल्यास विमा संरक्षण देय राहील. स्थानिक नैसर्गिक आपत्ती यामुळे पिकांचे नुकसान झाल्यास भरपाई देय राहील.

‘‘जोखिमेचा संरक्षण लाभ मिळण्यासाठी घटना घडताच ७२ तासाच्या आत शेतकऱ्यांनी विमा कंपनीला, कृषी व महसूल विभागाला पूर्वसूचना देणे आवश्यक आहे. काढणीपश्चात नुकसान भरपाई बाबींमध्ये शेतात पिकांची कापणी करून सुकवणीसाठी पसरवून ठेवलेली अधिसूचित पिके कापणीपासून दोन आठवड्यापर्यंत गारपीट, वादळ, अवकाळीपासून नुकसान झाल्यास भरपाई मिळते,’’ असेही गावसाने म्हणाले.

Crop Insurance
Crop Insurance : पीकविम्यासाठी जादा शुल्क घेतल्यास संपर्क साधा

...या पिकांना मिळणार संरक्षण

जिल्ह्यातील खरीप हंगामातील भुईमुगाला २९ हजार रुपये, खरीप ज्वारी २५ हजार रुपये, बाजरी २२ हजार रुपये, सोयाबीन ४५ हजार रुपये, मूग २० हजार रुपये, उडीद २० हजार रुपये, तूर ३२ हजार रुपये, कापूस २३ हजार रुपये, मका सहा हजार रुपये तर कांद्याला ६५ हजार रुपये प्रतिहेक्टरी याप्रमाणे विमा संरक्षण मिळेल.

शासन भरणार प्रिमियम

जिल्हयात खरीप हंगाम २०२३ मध्ये खरीप ज्वारी, बाजरी, भुईमूग, सोयाबीन, मूग, कापूस उडीद, तूर, मका, व कांदा या पिकांचा समावेश करण्यात आला आहे. सर्वसमावेशक ‘पीक विमा योजने’अंतर्गत शेतकरी हिस्स्याचा भार शेतकऱ्यांवर न ठेवता विमा हप्ता रक्कम या वर्षापासून राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे. त्यामुळे या वर्षापासून शेतकऱ्यांना केवळ ‘एक रुपया’ भरून पीक विमा पोर्टलवर नोंदणी करता येईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com