Ayushman Bharat Yojana Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Ayushman Bharat Yojana : आयुष्यमान भारत योजनेचा नागरिकांनी लाभ घ्यावा

Pradhan Mantri Jan Arogya Yojana : आयुष्यमान भारत किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे.

Team Agrowon

Nagar News : आयुष्यमान भारत किंवा पंतप्रधान जन आरोग्य योजना ही केंद्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. या योजनेंतर्गत पात्र लाभार्थ्यांवर योजनेच्या अंगीकृत रुग्णालयात ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येत आहेत.

या योजनेच्या लाभासाठी जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान भारत कार्ड प्राप्त करून घेण्याचे आवाहन प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

या योजनेंतर्गत जिल्ह्यात ४४ अंगीकृत रुग्णालये असून १ हजार २०९ प्रकारच्या विविध आजारांवर मोफत उपचार केले जातात. या आजारांमध्ये हृदय विकार, मेंदू विकार, किडनी विकार, अपघात, कर्करोग इत्यादी प्रकारच्या गंभीर आजारांवर उपचार व शस्त्रक्रिया मोफत केल्या जातात.

या योजनेचा लाभ हा आर्थिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लाभार्थ्यांना दिला जातो. आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेचे अहमदनगर जिल्ह्यामध्ये ११ लाख ९५५ लाभार्थी आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी या लाभार्थ्यांकडे आयुष्यमान कार्ड असणे आवश्यक आहे.

आतापर्यंत ३ लाख १५ हजार लाभार्थ्यांनीच आयुष्यमान कार्ड काढून घेतले आहे. अहमदनगर जिल्ह्यातील फक्त २९ टक्के लाभार्थ्यांनीच आयुष्यमान कार्ड काढून घेतले आहे. आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांची यादी www.pmjay.gov.in या वेबसाइटवर उपलब्ध आहे.

आयुष्यमान भारत, पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढून घेण्यासाठी ग्रामपंचायत मधील आपले सरकार सेवा केंद्र येथील केंद्र चालक तसेच खासगी आपले सरकार सेवा केंद्र येथील केंद्र चालक तसेच अंगीकृत रुग्णालयातील आरोग्य मित्रांशी रेशन कार्ड आणि आधार कार्ड घेऊन संपर्क साधणे आवश्यक आहे.

आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजना पात्र लाभार्थ्यांचे आयुष्यमान कार्ड काढून घेण्यासाठी जिल्हा प्रशासनाने शासन आपल्या दारी मोहिमेअंतर्गत सर्व तालुक्यांमध्ये शिबिरांचे आयोजन केलेले आहे.

अडचणी संदर्भात येथे संपर्क साधा

आयुष्यमान भारत पंतप्रधान जन आरोग्य योजनेच्या पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी आयुष्यमान कार्ड लवकरात लवकर काढून घ्यावे. याबाबत काही अडचण आल्यास जिल्हा रुग्णालय अहमदनगर येथील योजनेच्या जिल्हा कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Crop Damage Assessment : नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संवेदनशीलपणे करा

Maharashtra Water Cut: पुढील वर्षीपर्यंत पिण्यासाठी पाणी राखीव, १६ ऑक्टोबरपासून सर्वत्र १० टक्के पाणीकपात, शेतीसाठी पाणी कमीच, सरकारकडून नियोजन

Tiger Conservation : चार व्याघ्र प्रकल्पांच्या संवर्धन आराखड्यांना मंजुरी का नाही?

Ahillyanagar Bank Election : ‘सर्वांना विश्‍वासात घेतल्याशिवाय बिनविरोध करण्याचा निर्णय कसा?

Safflower Varieties: करडईचे कोणते वाण फायदेशीर? कोरडवाहू आणि बागायतीसाठी ८ पर्याय

SCROLL FOR NEXT