Maharashtra Devasthan Land Law: देवस्थान इनाम जमिनींबाबत कायदा तयार करण्यासाठी समिती तयार केली आहे. देवस्थानाच्या जमिनीवर ज्या ठिकाणी देवस्थानचा हक्क आहे; त्या जमिनी कोणीही बळकावू शकणार नाही. नव्या कायद्यामुळे देवस्थान जमिनीचे संरक्षण होईल, असे महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे..ते आज (२८ नोव्हेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. देवस्थानच्या इनाम जमिनींबाबत काही तक्रारी आल्या आहेत का? यावर बावनकुळे यांनी सांगितले की, देवस्थान इनाम जमिनीचा कायदा तयार करण्यासाठी समिती तयार केली असून, त्यात देवस्थानच्या सर्व प्रमुख पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. देवस्थान जमिनींचे संरक्षण करणे आणि त्या जमिनी त्यांना कायदेशीररित्या मिळण्यासाठी हा कायदा अधिवेशनात मांडला जाईल.यामुळे देवस्थान जमिनी आणि देवस्थाने मजबूत राहतील. यासाठी सरकार कायदा आणत असल्याचे त्यांनी नमूद केले. .Devasthan Inam Act: ‘देवस्थान इनाम’ कायद्याला विश्वस्तांचा विरोध.वनपट्टाधारकांना ७ ई, १२ ई देण्याची प्रक्रिया सुरू वनपट्टाधारक आदिवासी शेतकऱ्यांना ७ ई व १२ ई देण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. यामुळे या सर्व शेतकऱ्यांना मालकी हक्क प्राप्त होणार असल्याची माहिती महसूलमंत्र्यांनी दिली. पुढच्या तीन महिन्यांत वनपट्टाधारक शेतकऱ्यांना ७ ई आणि १२ ई मिळेल. ज्या अधिवासी शेतकऱ्याला अर्धा वनपट्टा मिळाला आहे त्यांना तो पूर्ण मिळणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. .Tribal Farmer Relief: वनपट्टेधारक आदिवासी शेतकऱ्यांनाही मिळणार कर्जमाफी, महसूलमंत्री बावनकुळेंची माहिती.आदिवासी शेतकऱ्यांना याआधी वनपट्टे मिळत होते. पण त्यांना त्याची मालकी मिळत नव्हती. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सूचना दिली होती की, याची मालकी झाली पाहिजे. आता ज्या आदिवासी शेतकऱ्यांना वनपट्टा मिळाला आहे; त्यांना ७ ए आणि १२ ई नमुना मिळेल. यामुळे त्यांची मालकी सिद्ध होईल, असेही बावनकुळे यांनी नमूद केले..वनहक्कधारकांसाठी स्वतंत्र ७ ई व १२ ई अभिलेखांना शासनाने नुकतीच मान्यता दिली होती. यामुळे त्यांना शेतकरी ओळख क्रमांक, पीक कर्ज, पीकविमा व कृषी योजनांचा लाभ मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. अनुसूचित जमाती व इतर पारंपरिक वननिवासी (वनहक्कांची मान्यता) अधिनियम, २००६ अंतर्गत पात्र वनहक्कधारकांना शेतकरी म्हणून अधिक सक्षम महसुली ओळख मिळावी आणि सरकारच्या विविध शेती योजनांचा लाभ सुलभपणे मिळावा, यासाठी राज्य सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला. .वनहक्कधारकांसाठी स्वतंत्र गाव नमुना ७ ई (वनहक्कधारकांचे अधिकार अभिलेख पत्रक) आणि पिकांच्या नोंदीसाठी स्वतंत्र गाव नमुना १२ ई (पिकांची नोंदवही) या नवीन अभिलेखांना मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन निर्णयही याआधीच जारी करण्यात आला आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.