Pradhan Mantri Kusum-B Yojana : पंतप्रधान कुसुम-ब योजनेच्या ऑनलाइन अर्जाला सुरुवात

Pradhan Mantri Kusum-B Yojana Online Application : ‘महाऊर्जा’मार्फत शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.
 kusum Scheme
kusum Scheme Agrowon
Published on
Updated on

ॲग्रोवन वृत्तसेवा
Nashik News
: ‘महाऊर्जा’मार्फत (Maha Urja) शेतकऱ्यांचे नवीन अर्ज स्वीकारण्यासाठी १७ मेपासून कुसुम योजनेचे (Kusum-B Yojana) ऑनलाइन पोर्टल सुरू करण्यात आले असून, त्यास प्रचंड प्रतिसाद मिळत आहे.

सर्व शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेता यावा म्हणून पोर्टलचा दररोज आढावा घेऊन जिल्हानिहाय कोटा वाढवून देण्यात येत आहे.

तरी शेतकऱ्यांनी कोटा उपलब्धीनुसार पोर्टलवर अर्ज करावा, असे आवाहन महाऊर्जा विभागीय कार्यालय, नाशिकचे विभागीय महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी यांनी केले आहे.

१३ जानेवारी २०२१ रोजी १ लाख सौर कृषिपंप व ३० ऑगस्ट २०२२ रोजी पुढील १ लाख सौर कृषिपंप असे एकूण दोन लाख सौर कृषिपंप आस्थापित करण्यासाठी मान्यता दिली.

राज्य शासनाकडून १२ मे २०२१ रोजी राज्यात या योजनेसाठी शासन निर्णय निर्गमित केला. या अंतर्गत दरवर्षी एक लाख नग या प्रमाणे पुढील ५ वर्षांमध्ये ५ लाख कृषिपंप आस्थापित करण्याचे उद्दिष्ट निश्‍चित केले.

या योजनेअंतर्गत खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९० टक्के व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांना ९५ टक्के अनुदानावर सौर कृषिपंप उपलब्ध आहे.

 kusum Scheme
MEDA Kusum Scheme : ‘कुसुम’ मधील सौरपंपांचा जिल्हानिहाय कोटा वाढणार

फसव्या संकेतस्थळाचा वापर टाळावा
महाऊर्जाच्या https://kusum.mahaurja.com/solar/beneficiary/register/Kusum-Yojana-Component-B या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज करता येणार असून, योजनेची व ऑनलाइन अर्ज करण्याची सर्व माहिती महाऊर्जा www.mahaurja.com संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

शेतकऱ्यांनी अधिकृत महाऊर्जाच्या संकेतस्थळावरुन अर्ज करावा व इतर कुठल्याही बनावट, फसव्या संकेतस्थळाचा वापर करू नये. महाऊर्जामार्फत सुरू केलेल्या ऑनलाइन पोर्टलचा लाभ सर्व शेतकऱ्यांनी घ्यावा.

तसेच ऑनलाइन पोर्टलवर अर्ज करताना येणाऱ्या अडचणींसाठी ०२०-३५०००४५६ /०२०-३५०००४५७ या दूरध्वनी क्रमांकावर तक्रार नोंदवावी, असेही विभागीय महाव्यवस्थापक कुलकर्णी कळविले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com