Farm Pond Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farm Pond Scheme : सामूहिक शेततळे योजनेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२२-२३ साठी सामूहिक शेततळे योजना राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

टीम ॲग्रोवन

बुलडाणा : एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत सन २०२२-२३ साठी सामूहिक शेततळे योजना (Farm Pond Scheme) राबविण्यात येत आहे. यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

सामूहिक शेततळे घटक फलोत्पादन पिकासाठी संरक्षित सिंचनाची सुविधा निर्माण करणे आणि दुष्काळी भागामध्ये फलोत्पादन पिकांच्या क्षेत्र विस्तारासाठी सिंचन सुविधा निर्माण करण्यासाठी १०० टक्के अनुदानावर राबविण्यात येणार आहे. या घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकरी समूहाकडे फलोत्पादन पीक असणे आवश्यक आहे.

यातील पात्र शेतकऱ्यांना सामूहिक शेततळे घटकासाठी आकारमाननिहाय अनुदान देय राहणार आहे. ३४×३४×४.७० मीटर आकाराच्या सामूहिक शेततळ्यासाठी दोन हेक्टर ते पाच हेक्टर किंवा त्यापेक्षा जास्त फलोत्पादन क्षेत्र असणे आवश्यक आहे. यासाठी तीन लाख ३९ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. २४×२४×४ मीटर आकाराच्या सामूहिक शेततळ्यासाठी एक हेक्टर ते दोन हेक्टर फलोत्पादन क्षेत्र असणे आवश्यक आहे. यासाठी एक लाख ७५ हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे.

या योजनेच्या लाभ घेऊ इच्छ‍िणाऱ्या शेतकऱ्यांनी mahadbtmahait.gov.in या पोर्टलवर सिंचन सुविधा या घटकाखाली अर्ज करावेत, अधिक माहितीसाठी कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी एस. जी. डाबरे यांनी केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farmers Relief: शेतकऱ्यांना वीजबिल मुक्तीची पत्रे पाठविणार; मुख्यमंत्री फडणवीस

Kalyan-Latur Highway Oppose: लातूर महामार्गाला जुन्नरमध्ये तीव्र विरोध

Forest Rights Farmers Issue: वनहक्क पट्टेधारक शेतकरी ‘ॲग्रीस्टॅक’वरून ‘गायब’

Agriculture Inspection: पीक पाहणीचा पाठपुरावा करावा; ‘महसूल’च्या जिल्हाधिकाऱ्यांना सूचना

Tobacco Streak Virus: कापसावर तंबाखू स्ट्रिक विषाणू ओळखा! नियंत्रणाचे उपाय काय?

SCROLL FOR NEXT