Orchard cultivation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Orchard Cultivation Scheme : भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लागू

Government Scheme : शासनाने शेतकऱ्यांसाठी (स्व.) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लागू केली आहे.

Team Agrowon

Dhule News : शासनाने शेतकऱ्यांसाठी (स्व.) भाऊसाहेब फुंडकर फळबाग लागवड योजना लागू केली आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी यांनी केले. योजनेंतर्गत वैयक्तिक शेतकऱ्यांनाच लाभ घेता येईल.

संस्थात्मक लाभार्थ्यांना लाभ घेता येणार नाही. शेतकऱ्यांच्या स्वतःच्या नावे सातबारा असणे आवश्यक आहे. जर सातबाऱ्यावर लाभार्थी संयुक्त खातेदार असेल तर सर्व खातेदारांचे फळबाग लागवडीसाठी संमतिपत्र आवश्यक राहील.

लाभ क्षेत्राची मर्यादा

या योजनेंतर्गत जमीन तयार करणे, माती व शेणखत, सेंद्रिय खतमिश्रणाने खड्डे भरणे, रासायनिक खते देणे, आंतरमशागत करणे, काटेरी झाडांचे कुंपण करणे ही कामे शेतकऱ्याने स्वखर्चाने करावयाची आहेत.

खड्डे खोदणे, कलमे, रोपे लागवड करणे, पीक संरक्षण, नांग्या भरणे, ठिबक सिंचनाद्वारे पाणी देणे ही कामे शासन अनुदानित आहेत. या योजनेंतर्गत लाभक्षेत्र मर्यादा किमान ०.२० हे. ते कमाल ६.०० हे. क्षेत्र इतकी आहे.

कमाल क्षेत्र मर्यादेत लाभार्थी त्याच्या इच्छेनुसार एकापेक्षा जास्त फळपिके लागवड करू शकेल. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांनी या योजनेचा ०.२० हे. हेक्टरपर्यंत लाभ घेतल्यानंतर उर्वरित क्षेत्रांसाठी फुंडकर फळबाग लागवड योजनेमधून लाभ घेता येईल.

ठिबक सिंचनाचे बंधन

लाभार्थ्याने यापूर्वी राज्य रोजगार हमी योजनेशी निगडित फळबाग लागवड वा अन्य योजनेंतर्गत लाभ घेतला असल्यास लाभ घेतलेले क्षेत्र वगळून उर्वरित कमाल क्षेत्र मर्यादेपर्यंत लाभार्थी पात्र राहील.

लागवड केलेल्या लाभार्थ्यांना फळबाग लागवडीचे अनुदान तीन वर्षांत ५०:३०:२० या प्रमाणात जिवंत कलमे रोपेच्या अधीन राहून देण्यात येईल (प्रथम वर्ष किमान ८० टक्के, द्वितीय वर्ष किमान ९० टक्के लागवडीनंतर झाडे जिवंत ठेवणे बंधनकारक).

फळबाग लागवडीसाठी निवड झालेल्या सर्व लाभार्थ्यांनी ठिबक सिंचन संच बसविणे बंधनकारक आहे. योजनेसाठी प्रत्येक शेतकऱ्याचा प्रकल्प हा स्वतंत्र समजण्यात येईल.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Unseasonal Rain: राज्याला अवकाळीचा तडाखा, १,४०० हेक्टरवरील पिकांच्या नुकसानीचा प्राथमिक अंदाज

Farmers Protest: मागण्याविषयी त्रस्त शेतकरी पुन्हा उतरले साडेपाच तास पाण्यात

Unseasonal Rain: पूर्वमोसमी, गारपिटीचा फटका

Rural Development: गावाची परिस्थिती समजून घ्या...

Jowar Farming: गल्लेबोरगावच्या शिवारात ज्वारीचा बोलबाला

SCROLL FOR NEXT