Crop Loan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Farmer Loan : कर्ज फेडणाऱ्या ४९ हजार शेतकऱ्यांना लाभ

महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली.

टीम ॲग्रोवन

औरंगाबाद : महात्मा जोतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ (Mahatma Phule Farmer Loan Waive Scheme) अंतर्गत पूर्णत: कर्ज परतफेड (Loan Repayment) करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ (Farmer Incentive Benefit Scheme)देण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. त्या लाभासाठी औरंगाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ४९९६१ कर्जदार सभासद लाभार्थी ठरले, असल्याची माहिती जिल्हा उपनिबंधक अनिलकुमार दाबशेडे यांनी दिली.

या प्रोत्साहन योजनेसाठी २०१७-१८, २०१८-१९ तसेच २०१९-२० हा कालावधी विचारात घेण्यात आला होता. २०१७-१८ या वर्षात घेतलेले अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१८ पर्यंत पूर्णत: परतफेड केलेले असल्यास आणि २०१८-१९ या वर्षातील अल्पमुदत पीक कर्ज ३० जून २०१९ पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास त्याचप्रमाणे २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीककर्ज ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत पूर्णत: परतफेड केले असल्यास २०१९-२० या वर्षातील अल्पमुदत पीककर्जाच्या रकमेवर जास्तीत जास्त ५० हजार रुपयांपर्यंत प्रोत्साहनपर रक्कम लाभ म्हणून देण्यात येणार आहे.

२०१९-२० या वर्षातील घेतलेल्या व त्याची पूर्णत: परतफेड केलेल्या अल्पमुदत पीक कर्जाची रक्कम ५० हजारापेक्षा कमी असल्यास अशा शेतकऱ्यांना प्रत्यक्ष घेतलेल्या अल्पमुदत पीककर्जाच्या मुद्दलाच्या रकमेइतका प्रोत्साहनपर लाभ देण्यात येईल. हा लाभ देताना वैयक्तिक शेतकरी विचारात घेऊन त्यांनी एक किंवा अनेक बँकांकडून घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाच्या परतफेडीची एकत्रित रक्कम विचारात घेऊन ५० हजार रुपये या कमाल मर्यादेत प्रोत्साहनपर लाभ निश्‍चित करण्यात आला. या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खासगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी शेतकऱ्यांना दिलेले अल्प मुदत पीककर्ज विचारात घेण्यात येणार आहे.

राज्यातील अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, गोंदिया, जळगाव, जालना, कोल्हापूर, परभणी, सांगली, सोलापूर, ठाणे आणि यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे शंभर टक्के कर्जदार शेतकरी प्रोत्साहन योजनेसाठी पात्र ठरले आहेत. राज्यातील २९ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांच्या अपेक्षित २३ लाख ५ हजार ८६५ कर्जदारांपैकी २२ लाख ६७ हजार ५४२ कर्जदार शेतकरी प्रोत्साहन योजनेत आले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मराठवाड्यातील जिल्हा

मध्यवर्ती बँकांचे पात्र लाभार्थी

बीड ८७४८

जालना २६,२१९

लातूर १ लाख ६३ हजार ३२५

नांदेड ५३३७४

उस्मानाबाद ५४१२३

परभणी ५५१५८

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Maharashtra Assembly Election Counting : पोस्टल मतमोजणीत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आघाडीवर; अजित पवार पिछाडीवर

Maharashtra Election Results 2024 : पोस्टल मतदानात कोल्हापूर, सांगली, साताऱ्यातून पहिला कल हाती

Election 2024 Maharashtra: सुरुवातीच्या कलात महायुतीचं पारडं जड; महाविकास आघाडी देते टक्कर

Sugarcane Harvesting : निवडणूक आटोपली, खानदेशात ऊस तोड सुरू करा

Cashew Cluster Scheme : सिंधुदुर्ग-रत्नागिरीसाठी काजू क्लस्टर योजना

SCROLL FOR NEXT