Crop Loan : खानदेशात पीक कर्ज वितरण कमीच

खानदेशात खरिपासंबंधी पीक कर्ज वितरण एप्रिल महिन्यात सुरू झाले आहे. पीक कर्ज वाटपात धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून, या बँकेने सुमारे २४० कोटी रुपये पीक कर्ज वितरण केले आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon

जळगाव ः खानदेशात खरिपासंबंधी पीक कर्ज (Kharif Crop Loan) वितरण एप्रिल महिन्यात सुरू झाले आहे. पीक कर्ज वाटपात (Crop Loan Disbursement) धुळे नंदुरबार जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक आघाडीवर असून, या बँकेने सुमारे २४० कोटी रुपये पीक कर्ज (Crop Loan) वितरण केले आहे. पण इतर बँकांची कामगिरी हवी तशी समाधानकारक नाही.

Crop Loan
Crop Damage : शेतीपिकांच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करा

रब्बी हंगाम आला, पण खरिपातील लक्ष्यांक पूर्ण न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. खानदेशात पीक कर्जासंबंधी खरिपात सुमारे २८०० कोटी रुपये निधीचे वितरण अपेक्षित होते. जळगाव जिल्ह्यात १८०० कोटी, धुळ्यात ५०० आणि नंदुरबारात ६०० कोटी रुपये वितरण अपेक्षित होते. परंतु यंदाही पीक कर्ज वितरण फक्त ६० टक्केच झाले आहे. राष्ट्रीयीकृत बँका एप्रिल ते मार्चपर्यंत पीक कर्ज वितरण सतत सुरू ठेवतात. या बँकांकडूनही पीक कर्ज वितरण हवे तेवढे झालेले नाही.

Crop Loan
Crop Damage : शेतीपिकांच्या नुकसानीचे अहवाल तातडीने सादर करा

राष्ट्रीयीकृत बँकांनी पुन्हा एकदा पीक कर्ज वितरणात हात आखडता घेतला असून, फक्त १५०० कोटी रुपये पीक कर्ज वितरण खानदेशात या बँकांनी केले आहे. कर्ज बँकांना आपल्या निधीतून वितरित करायचे असते. शासन फक्त वितरण लक्ष्यांक निश्चित करते. परंतु बँकांनी आपल्याकडील निधी व इतर बाबी लक्षात घेऊन १०० टक्के पीक कर्ज वितरण केलेले नाही. नवी पीक कर्ज प्रकरणे रखडली आहेत. आता रब्बीत वितरण करू, असे राष्ट्रीयीकृत बँका सांगत आहे.

बँकांमध्ये नव्या पीक कर्ज प्रकरणासंबंधी कार्यवाही संथ आहे. पीक कर्ज नूतनीकरण फक्त राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखांमध्ये केले जात आहे. जळगाव जिल्हा बँकेला पीक कर्ज वितरणाचा लक्ष्यांक राष्ट्रीयीकृत बँकांएवढाच आहे. जिल्हा बँकेच्या सर्वाधिक शाखा ग्रामीण भागात आहेत. यामुळे जिल्हा बँकेने पीक कर्ज वितरणात आघाडी घेतली होती. धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेला राष्ट्रीयीकृत बँकांच्या तुलनेत कमी कर्ज द्यायचे होते.

बॅंकाकडून केवळ टाळाटाळ

जळगाव जिल्ह्यात सेंट्रल बँक अग्रणी बँक म्हणून काम करते. तर नंदुरबारात स्टेट बँक अग्रणी बँक आहे. पीक कर्जाबाबत बँका व प्रशासनाची बैठक फक्त दोनदा झाली. यामुळे या समस्येकडे दुर्लक्ष आहे. पीक कर्ज वितरणास राष्ट्रीयीकृत बँका गती देत नसल्याचा मुद्दा शेतकरी उपस्थित करीत आहेत. कारण या बँका विविध कारणे सांगून शेतकऱ्यांना पीक कर्ज देत नाहीत.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com