Fruit Crop Cultivation Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Employment Guarantee Scheme : रोजगार हमी योजनेतंर्गत फळबाग लागवडीचा लाभ

Orchard Cultivation : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २०२३- २०२४ अंतर्गत जिल्ह्यास एकूण एक हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे.

Team Agrowon

Orchard planting Dhule News : महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना २०२३- २०२४ अंतर्गत जिल्ह्यास एकूण एक हजार हेक्टर क्षेत्रावर लागवड करण्याचे लक्षांक प्राप्त झाले आहे.

या योजनेत फळबाग लागवड आणि फुलपिके लागवडीचा लाभ घेण्यासाठी इच्छुक पात्र शेतकऱ्यांनी अर्ज करावे, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाने केले आहे.

या योजनेतंर्गत कमीत कमी ०.०५ हेक्टर ते जास्तीत जास्त २.०० हेक्टर क्षेत्रावर इच्छुक लाभार्थ्यांना लागवडीचा लाभ देण्यात येणार आहे.

अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटक्या जमाती, दारिद्र्य रेषेखालील कुटुंब, स्त्री कुटुंब प्रमुख असलेले कुटुंब, जमीन सुधारणाचे लाभार्थी, प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण योजनेतंर्गत लाभार्थी, अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वनवासी लाभार्थींना प्राधान्य देण्यात आल्यानंतर कृषी कर्जमाफी योजना २००८ मधील पात्र लाभार्थींना लाभ देण्यात येईल.

लाभ योजनेतील फळपिके

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थी शेतकऱ्यांकडे सातबारा, ८-अ उतारा, मजूर कार्ड (जॉबकार्ड) आदी कागदपत्रे तसेच ग्रामपंचायतीने मान्य केलेल्या लाभार्थी यादीत नाव असणे, प्रपत्र अ व प्रपत्र ब (फळबागेचे कार्य ग्रामपंचायत किंवा कृषी विभाग यापैकी कोणाकडून राबविण्यात रस आहे याचा स्पष्ट उल्लेख असावा) सादर करणे बंधनकारक आहे.

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण फळबाग लागवड योजनेतंर्गत केळी, आंबा, चिकू, पेरू, संत्रा, जांभूळ, अंजीर, चिंच, आवळा, नारळ, बांबू, साग, बोर, कागदी लिंबू, डाळिंब, आवळा, सीताफळ, मोसंबी, शेवगा आदी फळपिके व गुलाब, मोगरा, निशिगंध, सोनचाफा आदी फुलपिके लागवडीचा लाभ देण्यात येतो.

या योजनेचा लाभ घेण्यास इच्छुक पात्र लाभार्थ्यांनी विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र- अ) व संमती पत्र (प्रपत्र ब) ऑफलाइन पद्धतीने आपल्या गावातील ग्रामपंचायत किंवा संबंधित कृषी सहाय्यक/तालुका कृषी अधिकारी कार्यालय यांच्याकडे सादर करावे, असे आवाहन केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Farm Loan Waiver: कर्जमाफी योजनेची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु, शेतकऱ्यांची पहिली यादी जाहीर

Pandharpur Vitthal Darshan: दर्शन रांगेतील वयोवृद्ध दांपत्याला थेट विठ्ठल दर्शन

Kharif Crop Insurance: शेतकऱ्यांची खरीप पीकविम्याकडे पाठ

Fake Soybean Seed Issue: बोगस बियाण्यांच्या तक्रारीवर उलट शेतकऱ्यांवरच प्रश्नांचा भडिमार

Agriculture Scheme Subsidy Issue: परभणी जिल्ह्यातील ६७० शेतकरी अद्यापही अनुदानाच्या प्रतीक्षेत

SCROLL FOR NEXT