Rabi Sowing Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : लाभार्थ्यांना पोस्टात खाते उघडण्याची मुभा

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते उघडण्यासह आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Team Agrowon

पुणे : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत (PM Kisan Scheme) पात्र लाभार्थ्यांना त्यांचे बँक खाते (Farmer Bank Account) उघडण्यासह आधार क्रमांकाशी (Aadhar Linking) जोडण्याची सुविधा आता त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्याची सुरुवात बुधवारपासून (ता. १) झाली असून, ती १२ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे. या सुविधेचा लाभ लाभार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन कृषी आयुक्तालयातील (Agriculture Commissionerate) विस्तार व प्रशिक्षण विभागाचे कृषी संचालक विकास पाटील यांनी केले आहे.

केंद्र शासनातर्फे पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास दोन हजार रुपये प्रति हप्ता याप्रमाणे सहा हजार रुपये प्रति वर्षी लाभ देण्यात येतो.

या योजनेच्या १३ व्या हप्त्याचा लाभ जमा करण्याची कार्यवाही सध्या सुरू असून, त्यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

राज्यात सद्यःस्थितीत १४ लाख ३२ हजार लाभार्थ्यांची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न करण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे.

त्यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड, मोबाईल क्रमांक इत्यादी कागदपत्रांच्या आधारे इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत खाते उघडावे.

सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल. ही पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे.

पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेतील प्रलंबित लाभार्थ्यांची बँक खाती ‘आयपीपीबी’मध्ये उघडून ती आधार क्रमांकाशी जोडण्यासाठी ‘आयपीपीबी’ कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्याप्रमाणे पोस्ट मास्टर या लाभार्थ्यांना संपर्क करून ‘आयपीपीबी’मध्ये बँक खाती सुरू करतील. सर्व प्रलंबित लाभार्थ्यांनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहनही केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Shaktipeeth Highway Protest : जमीन द्यायची नाही अन् काही ऐकायचं नाही

Bogus Crop Insurance : बोगस पीकविमा काढल्यास आधार काळ्या यादीत

Paddy Plantation : रत्नागिरी जिल्ह्यात १५ हजार हेक्टर क्षेत्रावर भात लागवड

Solapur Rainfall : बळिराजानं पेरलं, पावसानं वाऱ्यावर सोडलं

Sugarcane Crushing : एक लाख हेक्टरवरील उसाचे होणार गाळप

SCROLL FOR NEXT