Shivraj Singh Chouhan Maharashtra Drought Visit: कमी पावसामुळे महाराष्ट्र आणि कर्नाटकात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीचा केंद्र सरकारकडून प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी पथक पाठविण्यात येणार आहे. केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान महाराष्ट्र आणि कर्नाटकचा दौरा करणार असल्याची माहिती त्यांनी सोमवारी (ता. २८) दिली..नवी दिल्ली येथे सुरू झालेल्या दोन दिवसीय राष्ट्रीय कृषी परिषदेत ‘रब्बी अभियान २०२६’चा प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण विभागातर्फे पूसा येथील भारतरत्न सी. सुब्रमण्यम सभागृहात आयोजित परिषदेत रब्बी हंगामाच्या तयारीसह हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर पीक नियोजन, निविष्ठांचा वेळेत पुरवठा आणि केंद्र-राज्य समन्वयावर चर्चा झाली..Maharashtra Drought Condition: राज्यातील तब्बल २५५ तालुक्यांत दुष्काळ.केंद्रीय राज्यमंत्री रामनाथ ठाकूर, भागीरथ चौधरी, कृषी सचिव अतीश चंद्रा, भारतीय कृषी संशोधन परिषदेचे महासंचालक डॉ. एम. एल. जाट, कृषी खात्याचे सचिव अतिश चंद्रा तसेच केंद्र आणि राज्य सरकारचे वरिष्ठ अधिकारी, कृषी विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ, कृषी विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते..महाराष्ट्रात मोठ्या क्षेत्रावर दुष्काळी परिस्थिती असल्याचे मंत्री चौहान यांनी सांगितले. रब्बी नियोजनासाठी प्रत्येक राज्य व जिल्ह्याने उपलब्ध पाण्याचा आढावा घेऊन ‘जल अंदाजपत्रक’ तयार करावे, असे निर्देश त्यांनी दिले. ‘‘जमिनीतील ओलावा आणि सिंचनाची उपलब्धता लक्षात घेऊन पिकांची निवड करावी. कमी पाणी असलेल्या भागात कडधान्ये व तेलबियांना प्राधान्य देण्याचे त्यांनी सुचविले..Maharashtra Drought Crisis: दुष्काळ नैसर्गिक संकट, राजकारण नको; कृषिमंत्री भरणे .पेरणीला विलंब झाल्यास उगवण व उत्पादनावर परिणाम होऊ शकतो, त्यामुळे तयारी वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. नैसर्गिक शेतीतील उत्पादनांचे विपणन व प्रमाणिकरण, किसान क्रेडिट कार्डची व्याप्ती तसेच ‘फार्मर आयडी’ आणि ‘ॲग्रीस्टॅक’ची कामे वेगाने पूर्ण करा. पिकांची स्थिती, पेरणी, उगवण, रोगांचा प्रादुर्भाव आणि बाजारभावाचा राज्यांनी दर आठवड्याला आढावा घ्यावा,’’ असेही ते म्हणाले..रब्बीतही राबवा ‘खेत बचाओ अभियान’धानानंतर रिकाम्या राहणाऱ्या क्षेत्रात हरभरा, मसूर, मोहरी आदी कडधान्ये व तेलबियांची लागवड वाढवावी. त्यासाठी क्षेत्र व उत्पादनाचे उद्दिष्ट निश्चित करून बाजारपेठ आणि खरेदीची व्यवस्था आधीच करावी, असे चौहान यांनी सांगितले. रब्बीसाठी योग्य वाणांची निवड, बियाण्यांची मागणी व वितरण तसेच खतांचा साठा वेळेत करण्याचे निर्देश त्यांनी दिले..कर्नाटकात ३ ऑक्टोबर रोजी केंद्रीय पथक प्रत्यक्ष पाहणी करणार असून, तसेच महाराष्ट्रातही पथक पाठविले जाणार आहे. मीदेखील या दोन्ही राज्यांचा दौरा करणार आहे.शिवराजसिंह चौहान, केंद्रीय कृषिमंत्री.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.