El Nino Impact on Farmers and Crops: आगामी रब्बी हंगाम पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांसाठी आव्हानात्मक ठरण्याची शक्यता असून, एल निनोच्या प्रभावामुळे अन्नधान्य उत्पादनावर मोठा परिणाम होऊ शकतो, असा इशारा कृषी सचिव अतिश चंद्र यांनी सोमवारी (ता.२८) दिला. .रब्बी हंगामाच्या तयारीसाठी आयोजित दोनदिवसीय राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते.चंद्र म्हणाले, की यंदाचा खरीप हंगामही विशेषतः पावसावर अवलंबून असलेल्या भागांसाठी आव्हानात्मक ठरला. अनेक राज्यांना सुरुवातीला पिकांची पेरणी साध्य करण्यासाठी आणि त्यानंतर पिके टिकवून ठेवण्यासाठी संघर्ष करावा लागला. गहू, मोहरी यांसारख्या रब्बी पिकांची पेरणी ऑक्टोबरपासून सुरू होते..Rain Deficit: पावसाच्या खंडाने खरीप हंगाम संकटात.‘‘आगामी हंगामात उत्पादनावर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता आहे. रब्बी हंगामही पावसावर अवलंबून असलेल्या क्षेत्रांसाठी आव्हानात्मक असेल,’’ असे चंद्र यांनी सांगितले. काही राज्यांमध्ये जमिनीतील अतिरिक्त ओलाव्याची समस्या निर्माण होऊ शकते, तर पावसाची तूट असलेल्या भागांमध्ये दीर्घकाळ पाण्याच्या ताणाला सामोरे जावे लागू शकते. त्यामुळे रब्बी हंगामासाठी त्यानुसार धोरणे आणि उपाययोजनांमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले..हवामान बदलाचे आव्हानहवामान बदल ही वस्तुस्थिती असल्याचे सांगताना चंद्र म्हणाले, की सिंचनाची सुविधा असलेल्या भागांमध्येही अनेक ठिकाणी अवेळी आणि अतिवृष्टी होत असून, त्याचा पिकांना फटका बसत आहे..‘‘हवामान बदलाची आव्हाने भविष्यात निर्माण होतील, असे आपण पूर्वी मानत होतो. मात्र, आता हे बदल प्रत्यक्ष घडताना दिसत आहेत आणि तेही वेगाने होत आहेत,’’ असे त्यांनी सांगितले. भारताने धान्य उत्पादनात स्वयंपूर्णता मिळवली असली, तरी डाळी, तेलबिया आणि फळांसारख्या काही बागायती उत्पादनांची आयात सुरूच असल्याचे चंद्र यांनी नमूद केले..Drought Management: दुष्काळातून आपण कधी शिकणार?.रब्बीची ६३८ लाख हेक्टरवर पेरणीरब्बी पिकांची साधारणपणे ६३८ लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी होते. त्यापैकी गव्हाचे क्षेत्र ३०० लाख हेक्टरपेक्षा अधिक, डाळींचे १४० लाख हेक्टर, तेलबियांचे ८७ लाख हेक्टर, तर भरडधान्यांचे ५५ लाख हेक्टर क्षेत्र आहे. स्वयंपूर्णता साधण्यासाठी पीक विविधीकरणावर भर देण्याची गरज असल्याचे चंद्र यांनी सांगितले. मात्र, संशोधन पद्धती, हवामान बदलाशी जुळवून घेण्याची क्षमता आणि शेतकऱ्यांचे उत्पन्न या बाबतीत पीक विविधीकरणासमोर आव्हाने असल्याचेही त्यांनी मान्य केले. .पीक विविधीकरणासोबत शाश्वत शेतीवरही भर देणे आवश्यक आहे. सरकारच्या दुसऱ्या प्राधान्यक्रमांतर्गत ‘पर ड्रॉप मोअर क्रॉप’ आणि मृदा आरोग्य यांसारखे उपक्रम राबविले जात आहेत. मात्र, या योजनांचे मूल्यमापन केवळ अनुदान वाटपाच्या दृष्टिकोनातून न करता प्रत्यक्ष शेतात झालेल्या परिणामांच्या आधारे करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले..डिजिटल शेतीला प्राधान्यडिजिटल शेतीला सर्वाधिक महत्त्वाचे प्राधान्य असल्याचे आतिश चंद्र यांनी सांगितले. माहितीच्या अभावामुळे किंवा असमतोलामुळे नियोजन कमकुवत होते. रब्बी, खरीप आणि उन्हाळी हंगामातील पिकांबाबत निर्णय घेण्यासाठी अचूक उत्पादन, लागवड क्षेत्र आणि शेतकरी ओळख क्रमांकाची माहिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. .शेतकरी ओळख क्रमांकाची (फार्मर आयडी) संकल्पना हे मोठे काम असून, एवढ्या मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांची माहिती असलेली व्यवस्था अन्य कोणत्याही देशात नाही, असा दावा त्यांनी केला. शेवटच्या टप्प्यातील संपर्क व्यवस्था कमकुवत झाली असून, ती पुन्हा सक्षम करण्याची गरज आहे. त्यासाठी शेतकरी ओळख क्रमांक तयार करून तो जमीन अभिलेखांशी जोडणे आणि शेतकऱ्यांना डिजिटल व्यवस्थेत आणणे आवश्यक असल्याचे चंद्र यांनी सांगितले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.