PM Kisan Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan : गावातील पोस्टात बँक खाते ‘आधार’शी जोडता येणार

PM Kisan Yojana : पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २००० रुपये प्रति हप्ता या प्रमाणे ६००० प्रति वर्षी लाभ देण्यात येतो.

Team Agrowon

PM Kisan Scheme Update : पंतप्रधान शेतकरी सन्मान (पीएम किसान) निधीतील १२.९१ लाख लाभार्थींची प्रलंबित बँक खाती आधार कार्डशी जोडण्याची सुविधा गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली असल्याची माहिती राज्याचे कृषी आयुक्त सुनील चव्हाण (Sunil Chavan) यांनी दिली आहे. १५ मेपर्यंत ही सुविधा असणार आहे.

पीएम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकरी कुटुंबास २००० रुपये प्रति हप्ता या प्रमाणे ६००० प्रति वर्षी लाभ देण्यात येतो. योजनेच्या १४ व्या हप्त्याचा लाभ मे किंवा जून २०२३ मध्ये जमा होणार आहे.

केंद्र शासनाने १४ व्या हप्त्याचा लाभ मिळण्यासाठी लाभार्थींनी त्यांचे लाभ जमा करावयाचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक केले आहे.

राज्यात सद्य:स्थितीत १२.९१ लाख लाभार्थींची बँक खाती त्यांच्या आधारक्रमांकास जोडलेली नाहीत. त्यामुळे या लाभार्थींच्या खात्यात १४ व्या हप्त्याचा लाभ जमा होणार नाही.

लाभार्थीना त्यांचे बँक खाते आधार क्रमांकाशी जोडण्याची सुविधा त्यांच्या गावातील पोस्ट मास्टर यांच्यामार्फत उपलब्ध करण्यात आली आहे. यासाठी आधार कार्ड, मोबाईल क्रमांक या कागदपत्रांचे आधारे आपल्या गावातील पोस्ट विभागाचे कर्मचारी यांच्यामार्फत इंडिया पोस्ट पेमेंट बँकेत (आयपीपीबी) खाते उघडावे. सदरचे बँक खाते आपल्या आधार क्रमांकाशी ४८ तासांत जोडले जाईल.

सदरची पद्धत कोणत्याही अतिरिक्त कागदपत्रांशिवाय करता येणार असल्याने अत्यंत सोपी व सुलभ आहे. आयपीपीबीमध्ये बँक खाते सुरू करण्याची सुविधा आपल्या गावातील पोस्ट कार्यालयातच उपलब्ध असल्याने लाभार्थींना इतरत्र जाण्याची गरजही पडणार नाही.

पीएम किसान योजनेतील प्रलंबित लाभार्थींची बँक खाती आयपीपीबीमध्ये उघडून ती आधार क्रमांकास जोडण्यासाठी राज्याच्या आयपीपीबी कार्यालयास गावनिहाय याद्या उपलब्ध करून दिल्या आहेत.

त्याप्रमाणे गावातील पोस्ट मास्टर या लाभार्थींना संपर्क करून आयपीपीबीमध्ये बँक खाती सुरू करणार असल्याची माहिती कृषी आयुक्त श्री. चव्हाण यांनी एका पत्रकान्वये दिली आहे.

१५ मेपर्यंत मुदत

योजनेच्या १४ व्या हप्त्याच्या लाभासाठी आधार संलग्न बँक खाते अनिवार्य केलेले असल्याने आयपीपीबीमार्फत १ मे २०२३ ते १५ मे २०२३ या कालावधीत यासाठी गाव पातळीवर सर्वत्र मोहीम राबविण्यात येत आहे. आयपीपीबीमार्फत आयोजित या मोहिमेमध्ये राज्यातील सर्व प्रलंबित लाभार्थींनी त्यांचे बँक खाते उघडावे, असे आवाहन करण्यात येत आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agriculture Irrigation Issues: प्रकल्पांच्या कालवा वितरण प्रणालीची दुरावस्था

Sunetra Pawar NCP National President: राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी सुनेत्रा पवार, एकमताने निवड

Onion Price Crisis: कांदा उत्पादक समितीचे काय झाले?; सत्यजीत तांबेंचा सरकारला सवाल

Grape Care After Rain: द्राक्षाला अवकाळीचा फटका? बाग वाचवण्याचे सोपे उपाय

Grape Farming: वातावरणातील बदलांनुसार पाणी बचतीवर भर आवश्यक

SCROLL FOR NEXT