Horticulture Development Mission Scheme
Horticulture Development Mission Scheme Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Horticulture Development Mission Scheme : फलोत्पादन विकास अभियानातील योजनांसाठी ऑनलाइन अर्ज करा

Team Agrowon

Nandurbar News : नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांना एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी https://mahadbtmahait. gov.in या संकेतस्थळावर ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियानांतर्गत फळे, फुले, मसाला लागवड व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे.

या घटकात विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी या फळपिकांच्या जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी लाभ मिळेल.

फुले घटकांत कट फ्लॉवर्ससाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास एक लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल २५ हजार प्रतिहेक्टर अनुदान दिले जाईल.

कंदवर्गीयासाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास एक लाख ५० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ६० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल ३७ हजार ५०० प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

सुटी फुलेसाठी अल्पभूधारक शेतकऱ्यास ४० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल १६ हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर इतर शेतकऱ्यास एकूण खर्चाच्या २५ टक्के किंवा कमाल १० हजार प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येईल.

फळांसाठीही अनुदान

विदेशी फळपीक लागवड घटकात ड्रॅगनफ्रूट, अंजीर व किवी फळासाठी शेतकऱ्यास चार लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख ६० हजार प्रतिहेक्टर अनुदान, तर स्ट्रॉबेरी फळासाठी शेतकऱ्यास दोन लाख ८० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल एक लाख १२ हजार प्रतिहेक्टर अनुदान तसेच पॅशनफ्रूट, ब्युबेरी, तेंदुफळ व अवॅकॅडो फळासाठी शेतकऱ्यास एक लाख प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत एकूण खर्चाच्या ४० टक्के किंवा कमाल ४० हजार रुपये अनुदान देण्यात येते.

जुन्या फळबागांच्या पुनरुज्जीवनासाठी शेतकऱ्यास ४० हजार प्रतिहेक्टर खर्चमर्यादेत खर्चाच्या ५० टक्के व जास्तीत जास्त २० हजार रुपये प्रतिहेक्टर अनुदान देण्यात येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Mahavitaran : ‘महावितरण’च्या यंत्रचालक, तंत्रज्ञांचा विशेष गौरव

Nagpur Lok Sabha : ...तर मतदानात वाढ झाली असती

Sangli Lok Sabha Election : सांगली लोकसभा मतदार संघात १६६८ दिव्यांग, ज्येष्ठांचे मतदान

Co-operative Credit Society : सांगलीतील २३१ सोसायट्यांचे संगणकीकरण मेअखेर पूर्ण करा

Water Tanker Bill : टॅंकरने पाणी पुरविणाऱ्यांची १५ कोटींचे देयके थकली

SCROLL FOR NEXT