Crop Insurance  Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : पीकविम्यासाठी जादा शुल्क घेतल्यास संपर्क साधा

Agriculture Department : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया शुल्क घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

Team Agrowon

Pune News : पंतप्रधान पीकविमा योजनेसाठी शेतकऱ्यांकडून केवळ एक रुपया शुल्क घेण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. मात्र, राज्यात काही ठिकाणी त्यापेक्षा जास्त रक्कम आकारली जात आहे. त्यामुळे जादा शुल्काची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून द्यावे, असे आवाहन कृषी आयुक्तालयाने केले आहे.

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांच्या म्हणण्यानुसार, खरीप २०२३ ते रब्बी २०२६ पर्यंत तीन वर्षांसाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी विमा क्षेत्र घटक धरुन पीकविमा योजना राबविण्याचा निर्णय शासनाने घेतलेला आहे. सर्वसमावेशक पीकविमा योजना राबविताना शेतकरी हिश्याची विमाहप्ता रक्कम राज्य शासनामार्फत भरण्यात येणार आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपया भरून https://pmfby.gov.in या संकेतस्थळावर विमा योजनेत भाग घेता येईल. स्वत: शेतकरी या संकेतस्थळाचा वापर करीत नोंदणी करू शकतात. तसेच बँक, विमा कंपनी प्रतिनिधी व सार्वजनिक सेवा केंद्राद्वारे (सीएससी) नोंदणी करता येते.

विमा योजनेत सहभागाच्या नोंदणीसाठी सीएससीधारकाला विमा कंपनीमार्फत प्रतिअर्ज ४० रुपये दिले जातात. परंतु, राज्यातील काही सीएससीधारक शेतकऱ्यांकडून अतिरिक्त पैसे घेण्यात येत असल्याबाबतच्या तक्रारी आयुक्तालयाकडे येत आहेत.

जादा रकमेची मागणी केल्यास शेतकऱ्यांनी पीकविमा कंपनीचे कार्यालय, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, जिल्हाधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन आयुक्तालयाने केले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Yavatmal Crop Insurance : यवतमाळच्या विम्यासंदर्भात सकारात्मक निर्णय घेऊ

Crop Insurance Scheme: नांदेडमध्ये पीकविमा योजनेत ९ लाखांहून अधिक अर्ज

Irrigation Projects : रखडलेल्या सिंचन प्रकल्पांना गती

Farm Loan Waiver: कर्जमाफी रक्कम वितरणास विलंब का? सहकारमंत्र्यांनी सांगितलं कारण

Mechanized Paddy Transplantation: यंत्राने भात लागवडीकडे वाढता कल

SCROLL FOR NEXT