Agri Business
Agri Business Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Agri Business : कृषी पदवीधरांसाठी कृषी आधारित उद्योग प्रशिक्षण

टीम ॲग्रोवन

केंद्र सरकारने शेतीशी संबंधित विविध योजना (Government Scheme) जाहीर केल्या आहेत.यासाठी सरकारकडून अनुदान (Subsidy) तसेच सुलभ कर्ज योजना (Loan Scheme) आहेत. या माध्यमातून आपण कृषी व्यवसाय सुरु करू शकतात.

ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटर (Agri Business Center) प्रशिक्षण योजना ः

- हे प्रशिक्षण भारत सरकारच्या कृषी मंत्रालय पुरस्कृत राष्ट्रीय कृषी विस्तार शिक्षण संस्था (मॅनेज) हैदराबाद यांच्या मार्फत देशांमध्ये ७५ हून अधिक ठिकाणी विविध प्रशिक्षण केंद्रामार्फत राबवली जाते.

- प्रशिक्षणाचा कालावधी ४५ दिवसांचा आहे.

ॲग्री क्लिनिक ः

- शेतकऱ्यांना विशेष विषय तज्ञांकडून मातीचे आरोग्य, मशागतीच्या पद्धती, पीक संरक्षण, पीक विमा, काढणीपश्चात तंत्रज्ञान, जनावरांची स्वच्छता व चारा व्यवस्थापन आणि बाजारातील पीकनिहाय किमती इत्यादी विषयी मार्गदर्शन केले जाते.

ॲग्री बिझनेस सेंटर ः

- कृषी सेवा केंद्र, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, भाडेतत्त्वावर कृषी यंत्रांचा पुरवठा.

- दुग्ध व्यवसाय, शेळीपालन इत्यादी सारख्या नवनवीन उद्योगांची उभारणी.

योजनेचे वैशिष्ट्ये ः

- कृषी व्यवसायाला चालना देण्यासाठी ही योजना आहे.

- या योजनांतर्गत २० लाख रुपयांचे कर्ज उपलब्ध करून देईल. ही रक्कम ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटर या योजनेत अंतर्गत दिली जाणार आहेत.

- या योजनेत सहभागी होणाऱ्यांना ४५ दिवसाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

कृषी आधारित व्यवसाय ः

- कृषी सेवा केंद्र, कृषीविषयक समुपदेशन केंद्र, कृषी पर्यटन, पशुखाद्य तयार करणे, जैविक खताची निर्मिती व विक्री, करार शेती.

- औषधी वनस्पतीचे उत्पादन, शेतमालाचे थेट विक्री, कृषी अवजार बँक, मत्स्यव्यवसाय, उद्यानविद्या केंद्र, फुलशेती शास्त्र.

- मधुमक्षिकापालन, रेशीम उद्योग, कीटकनाशकांचे उत्पादन व विक्री, बीज प्रक्रिया व विक्री, माती व पाणी परीक्षण प्रयोगशाळा, मत्स्य क्लिनिक.

- सेंद्रिय शेती, टिशूकल्चर, अन्नसाखळी व्यवस्थापन, भाजीपाला उत्पादन व विक्री, गांडूळखत निर्मिती, पशुवैद्यकीय दवाखाना, पीक उत्पादन.

- दुग्धव्यवसाय, शेळीपालन, कुक्कुटपालन, साठवणूक व्यवस्था, कृषी पत्रकारिता, मशरूम उत्पादन.

- कृषी पर्यटन, सोयाबीन व डाळ प्रक्रिया उद्योग, पॉलिहाऊस आणि रोपवाटिका.

प्रशिक्षणाची सोय ः

- या योजनेचा लाभ घेण्यासाठी नजीकच्या प्रशिक्षण केंद्रामध्ये प्रवेश घेणे गरजेचे आहे.

- हे प्रशिक्षण केंद्र राष्ट्रीय कृषी विस्तार शिक्षण, मॅनेज, हैदराबाद या भारत सरकारच्या कृषी मंत्रालयाच्या संस्थेशी जोडले गेले आहेत.

- प्रशिक्षण पूर्ण होताच तुमचा प्रकल्प अहवाल राष्ट्रीयकृत बँकेमध्ये जमा केल्यानंतर बँकेकडून आपणास कर्ज मिळेल. त्याचा परतावा तुम्ही १० ते १५ वर्षांमध्ये करू शकता.

शैक्षणिक पात्रता:

- आयसीएआर/यूजीसी द्वारा मान्यताप्राप्त पर्यावरण विज्ञान, वनस्पतिशास्त्र, प्राणिशास्त्र आणि रसायनशास्त्र पदवीधर,

- कृषी पदवीधर (B.Sc., B. Tech., M.Sc., M. Tech. & Ph.D in Agriculture).

- कृषी पदविकाधारक, डेअरी डिप्लोमा, पशुवैद्यकीय

महाविद्यालयाची पदवी (BVSc),

- मुक्त विद्यापीठ कृषी पदवीधर , पदविका धारक,

- १२ वी हॉर्टिकल्चर , क्रॉप सायन्स,क्रॉप प्रॉडक्शन

टीप ः पास झाल्यानंतर किमान १ वर्ष अंतर असणे आवश्यक आहे.

प्रवेशासाठी लागणारी कागदपत्रे :

१. चार फोटो, आधार कार्ड,

२. बँक पासबुक आधार लिंक

३. पदवी किंवा पदविका मार्कलिस्ट आणि सर्टिफिकेट,

४. जात प्रमाणपत्र

५. ७/१२ उतारा, रेशनकार्ड

प्रशिक्षण केंद्रांची वैशिष्ट्ये ः

- प्रशिक्षण केंद्र हे शेतकऱ्यांच्या शेतावर आधुनिक तंत्रज्ञान प्रभावीपणे पोहचविण्याचे कार्य करणारे अत्याधुनिक केंद्र आहे.

- कृषी आणि कृषी आधारित व्यवसायाला चालना देण्याचे उद्दिष्ट आहे.

- बँकर्सच्या माध्यमातून प्रोजेक्ट रिपोर्ट बनविण्यासाठी मार्गदर्शन केंद्रात केले जाते.

- कृषी उद्योग उभारणीकरिता प्रशिक्षणार्थ्यांना बँकेकडून पतपुरवठा मिळवून देण्यासाठी सहकार्य.

कर्ज मर्यादा ः

१) २० लाख रुपये. (वैयक्तिक प्रकल्पासाठी)

२) १ कोटी रुपये (पाच लोकांच्या सामूहिक प्रकल्पासाठी)

३) कर्ज कालावधी ५ ते १५ वर्षे (प्रकल्पावर आधारित)

४) नाबार्ड अंतर्गत शासकीय अनुदान: खुला प्रवर्ग ३६ टक्के, एससी,एसटी आणि महिला ४४ टक्के.

५) प्रशिक्षण कालावधी ः कालावधी: ४५ दिवस, मोफत राहण्याची व जेवणाची व्यवस्था.

--------------------------------------------------

संपर्क ः योगेश पाटील, ७७९८५८५८५९

( लेखक ॲग्री क्लिनिक आणि ॲग्री बिझनेस सेंटरचे नोडल ऑफिसर आहेत. वृषाली पाटील या डॉ.डी.वाय.पाटील कृषी महाविद्यालय,तळसंदे, जि. कोल्हापूर येथे विस्तार शिक्षण विभागामध्ये सहाय्यक प्राध्यापिका आहेत)

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Govind Hande: गोविंद हांडे यांचे निधन

Jal Jivan Mission : ‘जलजीवन’ अंमलबजावणीत नाशिक राज्यात अव्वल

Nagar Lok Sabha : नगर दक्षिणेत रडीचा डाव खेळला जातोय

Panand Road : निविदांविनाच मातोश्री पाणंद रस्त्यांची कामे

Kharif Season : खरीप हंगामाचे योग्य नियोजन करा

SCROLL FOR NEXT