मसाला उद्योग देईल भारताच्या कृषी निर्यातीला चालना

येत्या पाच वर्षांत देशातील मसाल्यांची निर्यात दुप्पट करण्यासह उत्पादनांच्या गुणवत्तेवरही लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी मसाला उद्योग क्षेत्राला केले आहे .
Spices
Spices
Published on
Updated on

नवी दिल्ली -  येत्या पाच वर्षांत देशातील मसाल्यांची निर्यात (Export Of Spices) दुप्पट करण्यासह उत्पादनांच्या गुणवत्तेवरही लक्ष केंद्रीत करण्याचे आवाहन केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग (Ministery Of Commerce And Industry) मंत्री पीयूष गोयल (Piyush Goyal) यांनी मसाला उद्योग क्षेत्राला केले आहे . भारतीय मसाले महामंडळाच्या (Spices Board Of India) स्थापना दिनानिमित्त गोयल यांनी शनिवारी (ता.२६) मसाला उत्पादक शेतकरी आणि निर्यातदारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.  

भारतीय मसालों का स्वाद, रहता है दुनिया में सभी को याद! India’s unique spices are a true reflection of the hard work of our farmers & our spices industry. Join the foundation day celebrations of @Spices_Board at 3:00 pm. Watch: https://t.co/XDeoDnADpT pic.twitter.com/cyEUBTvLen

— Piyush Goyal (@PiyushGoyal)

''भारतीय मसाला उद्योग क्षेत्राने कृषी निर्यातीत निर्णायक स्वरूपाची भूमिका बजावून निर्यातवाढीत योगदान देण्याचा प्रयत्न करावा. तसेच जागतिक स्तरावर अद्वितीय ठरतील असे भारतीय मसाला ब्रँड (Spices Brand) विकसित करण्यावर लक्ष केंद्रित करावे'', असे आवाहन गोयल यांनी यावेळी केले. कोरोना महामारीच्या काळात भारतातील औषधे आणि लसींसोबतच जगाने आपल्या मसाल्यांचे आणि काढ्यांचे महत्त्व (Importance Of Kadha) अनुभवले आहे. या योगदानासाठी आपले शेतकरी (Spices Producer Farmers) आणि निर्यातदार कौतुकास पात्र असल्याचेही गोयल यांनी नमूद केले.  

भारतीय मसाले महामंडळाच्या स्थापना दिनानिमित्त गोयल यांनी पोस्टाच्या तिकीटाचे अनावरण केले. तसेच वेलचीसाठी हवामान आधारित विमा योजनेचा शुभारंभही केला. अशाच विमा योजना भारतभरातील विविध पिकांसाठी लागू करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. अन्न सुरक्षा आणि गुणवत्ता सुनिश्चित करण्याच्या गरजेवर भर देताना त्यांनी काश्मिरी केशर, नागा मिरची, लकडोंग हळद आणि यूपीची कलोंजी यासारख्या देशांतर्गत भारतीय मसाल्यांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत नेण्यासाठी सर्व भागधारकांनी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन केले. हेही वाचा - ‘कापूस ते कापड’ हे स्वप्नच ठरले

निर्यातीला चालना देण्यासाठी भारतीय मसाल्यांच्या पॅकेजिंग आणि ब्रँडिंगवर काम करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या. २०३० मध्ये गाठायचे ३० अब्ज डॉलर्स मसाला निर्यातीचे उद्दिष्ट २०२७ पर्यंत साध्य करण्याचे आवाहन करताना गोयल यांनी त्यापुढील पाच वर्षांत निर्यात दुपटीने वाढवण्याचीही सूचना भारतीय मसाला निर्यातदारांना केली आहे. यासाठी मसाला निर्यातदारांना सरकारकडून भरपूर सहकार्य केले जाईल, याची ग्वाहीही गोयल यांनी दिली आहे. 

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com