Crop Insurance
Crop Insurance AGrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Crop Insurance : अकोल्यात पीकविमा कंपनीकडे ८५,७०३ पूर्वसूचना

टीम ॲग्रोवन

अकोला ः या खरीप हंगामात अतिवृष्टी (Heavy Rain), पूर अशा नैसर्गिक आघातांमुळे (Natural Calamity) शेतकरी पार कोलमडला आहे. पीकविमा (Crop Insurance) काढलेल्यांपैकी सुमारे ८५ हजारांवर पूर्वसूचना (Crop Damage Intimation) कंपनीकडे दाखल झालेल्या आहेत. यापैकी किमान ३९ हजार शेतकऱ्यांना मदत केली जाऊ शकते. पीकविमा कंपनीने तातडीने मदत द्यावी, या मुद्द्यावर गुरुवारी (ता.२०) शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात बैठक घेतली.

या वेळी झालेल्या चर्चेत तातडीने पीकविमा देण्याच्या मुद्द्यावर अधिकारी, कंपनी प्रतिनिधींना सूचना केली. शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत दिली जावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख गोपाल दातकर यांनी केली.

शेतकऱ्यांना पीकविमा दिवाळीपूर्वी दिला जावा यासाठी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयात धडक दिली. या वेळी जिल्हा अधीक्षक आरिफ शहा यांच्यासह विमा कंपनीचे प्रतिनिधी चर्चेसाठी उपस्थित होते.

श्री. दातकर यांनी जिल्ह्यात पिकांची पाऊस व पूरस्थितीने अत्यंत बिकट परिस्थिती झालेली असून शेतकऱ्यांना सणासुदीच्या दिवसात दिलासा देण्याची गरज व्यक्त केली. शेतकऱ्यांनी पीकविमा काढलेला असून त्यांना मदत केली जावी, असे सुचवले. या वेळी विविध विषयांवर त्यांनी चर्चा केली.

अकोला जिल्ह्यात या हंगामात पिकांचे मोठे नुकसान झालेले आहे. पीकविमा काढलेल्यांपैकी नुकसान झालेल्या सुमारे ८५ हजार ७०३ शेतकऱ्यांनी आतापर्यंत पूर्वसूचना दिल्या. पूर्वसूचना दिलेल्यांपैकी सुमारे ३९ हजार शेतकऱ्यांना पीकविम्याची मदत दिली जाणार आहे. यापैकी १८ हजार शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच ही मदत पाठवली जाऊ शकते. तर, उर्वरित शेतकऱ्यांना बुधवारपर्यंत (ता.२६) मदत मिळण्याची शक्यता या वेळी व्यक्त करण्यात आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Weather Update : कोकणात उष्ण, दमट हवामानाचा इशारा

POCRA Scheme : पोकरा प्रकल्पाच्या पहिल्या टप्‍प्याची आवराआवर

Sugar Production : सांगलीत साखर उत्पादनात सात लाख क्विंटलने वाढ

MahaRally Meeting : धुळ्यात महारॅलीची प्रशासनाकडून जय्यत तयारी

Severe Water Shortage : लोकसभेच्या रणधुमाळीत सातारा जिल्ह्यात भीषण पाणी टंचाई

SCROLL FOR NEXT