Agricultural Sanjeevani Project
Agricultural Sanjeevani Project Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

POCRA Project : ‘पोकरा’अंतर्गत ८३ कोटींचे अनुदान वितरित

Team Agrowon

हिंगोली ः नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (Agricultural Sanjeevani Project) (हवामानाअनुकुल कृषी प्रकल्प ः पोकरा) अंतर्गंत शनिवार (ता.१७) पर्यंत विविध घटकांची कामे पूर्ण केलेल्या २६ हजार ८५५ शेतकऱ्यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर (डीबीटी) प्रणालीव्दारे ८३ कोटी ९८ लाख ८६ हजार रुपये एवढी अनुदानाची रक्कम जमा करण्यात आली आहे अशी माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली.

पोकरा अंतर्गंत तीन टप्प्यामध्ये हिंगोली जिल्ह्यातील २४० गावांची निवड झालेली आहे. या गावांतील शेतकऱ्यांना फळबाग लागवड, विहिरी, विद्युत पंप, शेततळी, शेडनेट, पॉलिहाऊस, तुषार संच, ठिबक संच, मत्स्यपालन, परसातील कुक्कुटपालन, रेशीम शेती, बिजोत्पादन, कंपोस्ट खत निर्मिती, शेततळ्यातील मत्स्यपालन आदी घटकाअंतर्गंत कामे पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अनुदानाची रक्कम अदा केली जाते.

घटकनिहाय अनुदान रक्कम (कोटी रुपये)

घटक लाभार्थी शेतकरी संख्या अनुदान रक्कम

ठिबक सिंचन संच ५८७६ ३९.४२

तुषार संच ११७९१ २०.७३

फळबाग लागवड १४७३ ६.३७

शेततळे २१ ०.६८

विहीरी २५ ०.५८

कृषीपंप १९१५ २.७४

पाइप २७०७ ४.९७

शेडनेटगृह ३५ ४.९५

बीजोत्पादन २१६६ २.०६

कृषी यांत्रिकीकरण ८४ ०.४८

कंपोस्ट खत निर्मिती ३८ ०.२

शेतीशाळा यजमान शेतकरी ६०५ ०.१६

शेडनेट,पॉलिहाऊस साहित्य ५ ०.६

रेशीम शेती ४९ ०.४०

मत्स्यपालन ११ ०.४

शेळीपालन ५२ ०.२०

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Onion Rate : कांद्याचे बाजार शुल्क घटवले एक रुपयावरून ५० पैशांवर

Crop Damage : गारपीट, वादळी पाऊस होऊनही पीक नुकसान नसल्याचा अहवाल

Veterinary : पशुचिकित्सा पुनर्रचनेविरोधात पदविकाधारकांनी थोपटले दंड

Crop Damage : अवकाळी पावसामुळे एक हजार हेक्टरवर नासधूस

Onion Market : ‘एनसीसीएफ’द्वारे उद्यापासून सुरू होणार कांदा खरेदी

SCROLL FOR NEXT