Jayakwadi Dam
Jayakwadi Dam Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

Reserved Water : जळगावात ७९.९८ दलघमी पाणी होणार आरक्षित

टीम ॲग्रोवन

जळगाव : जिल्हास्तरीय आकस्मिक पिण्याचे पाणीनिश्‍चिती (Water Security) समितीच्या बैठकीत पालकमंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी ७९.९८ दशलक्ष घनमीटर मागणी आरक्षणास (Water Reservation) मान्यता दिली आहे. लघुपाटबंधारे प्रकल्पाच्या मुख्य वितरिका व पाटचाऱ्यांच्या दुरुस्तीचे प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. या वेळी जिल्हाधिकारी अमन मित्तल यांनी ज्या दहा लघुप्रकल्पांमध्ये अल्पसाठा आहे त्या प्रकल्पांतर्गत गावांमध्ये पाणीटंचाई (Water Shortage) भासू नये यासाठी सूक्ष्म नियोजन करून भविष्यात पाणीटंचाई होणार नाही याची काळजी घेण्याची सूचना केली.

जळगाव जिल्ह्यात हतनूर, गिरणा आणि वाघूर हे तीन मोठे प्रकल्प असून, त्यावर १४० गावे अवलंबून आहेत. बोरी, भोकरबारी, मन्याड, अंजनी, अग्नावती, बहुळा, तोंडापूर, हिवरा आणि गूळ या मध्यम प्रकल्पांवर १११ गावे अवलंबून आहेत, तर ४० लघू प्रकल्पांचा १११ गावांना लाभ होतो. अर्थात, तिन्ही प्रकारांतील प्रकल्पांचा जिल्ह्यातील ३६२ गावांना लाभ होतो. या सर्व प्रकल्पांमधील ७९.९८ दशलक्ष घनमीटर पाणी आरक्षणाला या बैठकीत मान्यता देण्यात आली.

जिल्हास्तरीय पाणी आरक्षण समितीची बैठक पालकमंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखाली अजिंठा शासकीय विश्रामगृहात घेण्यात आली. मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया, महापालिका आयुक्त विद्या गायकवाड, अधीक्षक अभियंता आणि प्रशासक लाभक्षेत्र विकास प्राधिकरण एस. डी. दळवी, गिरणा पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता डी. पी. अग्रवाल, शहर अभियंता एम. जी. गिरगावकर, महसूलचे नायब तहसीलदार अमित भोईटे, पाटबंधारे विभागाचे डी. बी. बेहेरे, मध्यम प्रकल्पाच्या अदिती कुलकर्णी, मजीप्रा अधीक्षक अभियंता एस. सी. निकम, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता जी. एस. भोगवडे व महसूल सहायक मोनीष बेंडाळे व उपअभियंता शशिकांत चौधरी उपस्थित होते. प्रास्ताविकात श्री. दळवी यांनी पाणी आरक्षणाबाबत सविस्तर माहिती दिली. नायब तहसीलदार भोईटे यांनी सूत्रसंचालन केले.

अकरा गावांचा नव्याने समावेश

अंजनी मध्यम प्रकल्पांतर्गत पाणी आरक्षण कल्याणे खुर्द, वाघाळूद, चावळखेडा, पिंपळेसीम, भोद बुद्रुक, भोद खुर्द, हनुमंतखेडे, कल्याणे होळ, हिंगोणे खुर्द सतखेडा या अकरा गावांचा नव्याने समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी व ग्रामस्थांना पिण्याच्या पाणीवापरासाठी मोठा दिलासा मिळणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Lemon Rate : लिंबाचे दर पोहोचले ६,५०० रुपयांवर

Hirda Picking : जुन्नर तालुक्यात हिरडा गोळा करण्याची लगबग

Yedgaon Dam Victim : येडगाव धरणग्रस्त शेतकऱ्यांसाठी धरणात पाणीसाठा राखून ठेवावा

Interview with PM Narendra Modi : आर्थिक विकासाची महाराष्ट्रासाठी ‘गॅरंटी’

Sugar Market : कोट्यापेक्षा जादा साखर विक्री कारखान्यांना पडली महागात

SCROLL FOR NEXT