Ahilyanagar News: अतिवृष्टी, पुराच्या नुकसानीतून वाचलेला कापूस वेचण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. मात्र मजूर मिळत नसल्याने शेतकरी त्रस्त आहेत. त्यातच वेचणीचे दर वाढले असून, प्रति किलोला तेरा ते पंधरा रुपये मोजावे लागत आहेत. पावसाने भिजलेल्या कापसाचा दर्जा कमी झाल्याचे सांगून बाजारात आणि रस्त्यावर खरेदीदार मातीमोल दराने कापूस खरेदी करीत आहेत..अहिल्यानगर, बीड, जालना, धाराशिव, लातूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, नांदेडसह विदर्भात कापसाचे क्षेत्र अधिक आहे. यंदा अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी शेतात साचून राहिल्याने झाडाचे, तसेच बोंडांचे नुकसान झाले. त्याचा उत्पादनावर परिणाम होणार आहे. यंदा जवळपास ६० टक्के कापसाचे क्षेत्र बाधित झाले असून, संकटातून वाचलेला कापूस पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची लगबग सुरू आहे..Cotton Procurement: कापूस खरेदी नोंदणी जलद व पारदर्शक करण्यासाठी ‘ॲग्रीस्टॅक पोर्टल’चा वापर करावा: पणन मंत्री जयकुमार रावल.आठ दिवसांपासून उन्हाचा कडाका वाढल्याने कापूस फुटण्याला वेग अधिक आहे. त्यामुळे तातडीने वेचणी करणे गरजेचे आहे, मात्र दिवाळीमुळे मजुरांची अडचण भासू लागली आहे. मजुरांअभावी वेचणीला आलेला कापूस पडून आहे. सध्या वेचणीला १३ ते १५ रुपये प्रति किलोला दर द्यावा लागत आहे. त्यात अजून कोठेही सरकारी कापूस खरेदी सुरू झालेली नाही. रस्त्यावर व खासगी खरेदीदार वाटेल त्या दराने खरेदी करत आहे..Cotton Rate: धामणगाव रेल्वे बाजार समितीत कापसाला ७११० रुपयांचा दर.रस्त्यावरील खरेदीला कंट्रोल कोणाचे?अहिल्यानगर, बीड, सोलापूरसह अन्य कापूस उत्पादक जिल्ह्यांत रस्त्यावर कापसाची खरेदी सुरू आहे. राज्याच्या व राज्याबाहेरील अनेक खरेदीदार, व्यापारी राजरोस रस्त्यावर कापसाची खरेदी करीत आहेत. विशेष म्हणजे त्यांना वाटेल तो दर देऊन खरेदी करत आहेत. त्यांना खरेदीची परवानगी आहे का, शेतकऱ्यांची सर्रास लूट होत असताना त्यावर कोणाचा निर्बंध आहे का, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. मिळालेल्या माहितीनुसार ज्या बाजार समितीच्या हद्दीत खरेदी तेथे त्या बाजार समितीचे कंट्रोल असते. अशा अनधिकृत खरेदीदारावर बाजार समिती कारवाई करू शकते. मात्र आपल्याला अधिकार आहेत, याची बाजार समितीलाच जाणीव नसल्याचे दिसत आहे..सरकारी खरेदी कधी?अहिल्यानगर जिल्ह्यासह राज्यात अजून कापसाची सरकारी खरेदी सुरू झालेली नाही. दर वर्षी शेतकरी दिवाळीसाठी कापसाची विक्री करतात. हा अनुभव असतानाही अजून शासनाकडून कोठेही सरकारी कापूस खरेदी केंद्रे सुरू केलेली नाहीत. बाजारात व्यापारी मात्र कापसाची दर्जा चांगला नसल्याचे सांगून ३ ते ६ हजार रुपये क्विंटलपर्यंत खरेदी करीत आहेत. खर्चाच्या तुलनेत हा दर परवडणारा नाही, असे शेतकरी अतुल तांबे म्हणाले. मातीमोल दराने खरेदी सुरू असल्याने गरजवंत कापूस उत्पादक यात भरडला जात आहे, असेही ते म्हणाले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.