PM Kisan Yojna News Agrowon
कृषी योजना व शासन निर्णय

PM Kisan Scheme : ‘पंतप्रधान किसान सन्मान’ची ७७ टक्के ई-केवायसी पूर्ण

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील लाभार्थ्यांची ऑनलाइन ई-केवायसी प्रक्रिया धुळे जिल्ह्यातील ७७ टक्के लाभार्थ्यांनी पूर्ण केली असून अद्याप २३ टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

टीम ॲग्रोवन

धुळे : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेतील (PM KIsan Scheme) लाभार्थ्यांची ऑनलाइन ई-केवायसी (PM Kisan E-KYC) प्रक्रिया धुळे जिल्ह्यातील ७७ टक्के लाभार्थ्यांनी पूर्ण केली असून अद्याप २३ टक्के लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.

पंतप्रधान किसान सन्मान योजनेसाठी शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी करून घ्यावी. अन्यथा योजनेच्या पुढील लाभापासून वंचित राहावे लागेल, असे जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी प्रसिद्धिपत्रकात म्हटले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी (पीएम किसान) https://pmkisan.gov.in या संकेतस्थळावरील फार्मर कॉर्नर या टॅबमध्ये किंवा पीएम किसान ॲपमध्ये ओटीपीद्वारे लाभार्थ्यांना स्वत: ई- केवायसी प्रमाणीकरण मोफत करता येईल. तसेच ग्राहक सेवा केंद्रावर (CSC) नाममात्र शुल्कात बायोमॅट्रिक पद्धतीने करता येईल.

तसेच, पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ आधार क्रमांकास जोडलेल्या बँक खात्यामध्येच जमा होणार असल्याने शेतकऱ्यांनी त्यांचे बँक खाते आधार क्रमांकास जोडणे बंधनकारक आहे. यासाठी लाभार्थ्यांनी त्यांचे खाते असलेल्या बँकेत जाऊन आधार व मोबाइल क्रमांक स्वतःच्या बँक खात्यास जोडून घ्यावा, असे प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेखा चव्हाण यांनी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Sugarcane Harvesting: खानदेशात ऊस तोडणीला गती

Aliv Farming: चिवरा शिवारात आळीव लागवड

Sugarcane Crisis: माजलगावात उसाला तुरे; शेतकरी कारखान्यांच्या उंबरठ्यावर

Aravalli Hills Conservation: म्हाताऱ्या पर्वताला वाचविण्यासाठी झटणारा शेतकरी

Women International Year 2026: आंतरराष्ट्रीय महिला शेतकरी वर्ष केवळ उत्सव की खरी मान्यता?

SCROLL FOR NEXT